रिसोड (Risod Bazar Samiti) : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीन हंगामाच्या खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या हंगामातील नवीन सोयाबीन घेऊन आलेले शेतकरी एकनाथ मुंढे (रा. सावरखेडा) यांचा बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांच्या हस्ते टॉवेल व टोपी घालून यथोचित सत्कार करण्यात आला. शेतकरी एकनाथ मुंढे यांनी विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनचा लिलाव बाजार समितीमधील 'नम्रता ट्रेडिंग कंपनी' येथे पार पडला. या पहिल्याच मुहूर्ताच्या लिलावात नवीन सोयाबीनला ६,१०० रुपये प्रति क्विंटल असा समाधानकारक भाव मिळाला.
या (Risod Bazar Samiti) खरेदी शुभारंभप्रसंगी बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर, उपसभापती गजानन अवताडे, सचिव विजय देशमुख, संचालक रवींद्र चोपडे, रमेश गायकवाड, रामचंद्र बुधनेर, खरेदीदार असोसिएशनचे अध्यक्ष किशोर कोठुळे, व्यापारी मुरली शेठ मुंदडा, किसन अग्रवाल, गोपाल कासट प्रल्हाद गायकवाड यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव, व्यापारी, आडते आणि हमाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन सोयाबीन खरेदीचा शुभारंभ; पहिल्याच लिलावात ६,१०० रुपये प्रतिक्विंटल दर
Risod Bazar Samiti: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीन हंगामाच्या खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या हंगामातील नवीन सोयाबीन घेऊन आलेले शेतकरी एकनाथ मुंढे (रा. सावरखेडा) यांचा बाजार समिती
Risod Bazar Samiti
संबंधित सामग्री
फेरभाडेपट्ट्याला मान्यता, रिसोड बाजार समितीला मिळणार दीड कोटींवर महसूल!
Risod Bazar Samiti: कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोडच्या आर्थिक उत्पन्नवाढीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या दूरदर्शन केंद्राच्या जागेच्या फेरभाडेपट्टयाला शासनस्तरावर मान्यता मिळाली आहे.
विदर्भातील नवे ‘हळद हब’आठवड्याला १० हजार क्विंटलची आवक; प्रति क्विंटल मिळाला १७ हजार रुपयांपर्यंत भाव
Risod Bazar Samiti: जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळख निर्माण केलेल्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा हळदीची विक्रमी आवक
विनापरवाना शेतमाल खरेदी केल्यास होणार कारवाई
Risod Bazar Samiti: शेतमाल खरेदी-विक्री व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी पणन संचालनालयाने आता कंबर कसली