Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > शेती

बीज अंकुरण तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना बीज अंकुरण व बीज प्रक्रिया तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

Seed Germination Technology: विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात विद्यार्थी शेतकऱ्यांस बिझांचा गुणवत्ता परीक्षण, निवड आणि अंकुरण कौशल्य सुचविले.


शेतकऱ्यांना बीज अंकुरण व बीज प्रक्रिया तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

Seed Germination Technology |

 

विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा उपक्रम

मेहकर (Seed Germination Technology) : हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी नागझरी बुद्रुक (ता. मेहकर) येथे शेतकऱ्यांना भेट देत बीज अंकुरण क्षमता परीक्षण व बीज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांची निवड, बीज अंकुरण चाचणीची पद्धत तसेच बीज प्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगितले.

या (Seed Germination Technology) उपक्रमासाठी कार्यक्रम प्रमुख डॉ. पी. एम. तायडे, व्ही. जी. पालवे आणि एम. एस. वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी बीज अंकुरण चाचणीसाठी नमुने घेण्याची योग्य पद्धत, परीक्षण प्रक्रिया आणि त्यातून मिळणारे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश जकाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी बीज अंकुरण परीक्षणामुळे बियाण्यांची गुणवत्ता तपासता येते, उत्पादनवाढीस मदत होते तसेच पेरणीपूर्वी योग्य नियोजन करता येते, असे सांगितले.

या (Seed Germination Technology) उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बीज अंकुरण परीक्षण व बीज प्रक्रियेचा अनुभव मिळाला. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांचे व्यवहारिक ज्ञान अधिक समृद्ध झाले. या उपक्रमात कृषी विद्यार्थी अंकुर परीहार, शंतनू पांगरकर, वेदांत धोंडगे आणि राहुल इळपाचे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.