Farmers' Loan Waiver Andolan: चिखलीच्या तालुक्यातून शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांनी मुख्यमंत्रीला आंदोलनाची तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे. त्यांचा अन्नत्याग आंदोलन
तुपकरांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घ्या; अन्यथा रस्त्यावर उतरू: विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांचा इशारा
चिखली (Farmers' Loan Waiver Andolan) : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीकविमा यासह अव्वा च्या सव्वा बिल येत असल्याने सामान्य नागरीकांना याची झळ बसत असल्याने स्मार्ट मिटरची सक्ती थांबविण्यात यावी, त्याचप्रमाणे सौर उर्जाची सक्ती थांबविण्यात यावी शेतकऱ्यांना पुर्वी प्रमाणे मागेल त्याला कनेक्शन देण्यात यावे. कृषी औजारे व फळबाग योजनेचे रखडलेले अनुदान अदा करण्यात यावे, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते मा. रविकांत तुपकर यांचे बुलढाणा येथील निवासस्थानासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
तुपकरांच्या या (Farmers' Loan Waiver Andolan) आंदोलनाला चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील जोरदार पाठिंबा दिला आहे. आज चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांच्या नेतृत्वाखाली चिखली पोलीसचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्याशी चर्चा करीत शेतकऱ्यांच्या वतीने ठाणेदारांमार्फत मा. मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आले. ठाणेदारांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून ते शासन दरबारी पाठवण्याचे आश्वासन दिले. यावेळी चिखली तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी विलास वसु, नवलसिंग मोरे,सरदारसिंग इंगळे,गजानन कुटे,दत्ता मोरे,राजेंद्र मोरे,सुमंथा वसू,विठ्ठल वसू,इश्वर कमळीक,मंगेश भगवानराव मोरे,गणेश मोरे,बळीराम मोरे,यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'आंदोलन छेडू, सरकार जबाबदार राहील'
सकाळी चिखली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी विनायक सरनाईक, नितिन राजपुत, भगवान मोरे यांच्यासह आदिंना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी ठाणेदार यांनी नोटिस बजावली आहे. दरम्यान कार्यकर्ते यांनी सुद्धा आज निवेदन दिले असून, सरकारने तुपकरांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन मागण्या मान्य न केल्यास, चिखली तालुक्यातील शेतकरी देखील आक्रमक आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा यावेळी विनायक सरनाईक यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.
सरकारवर वाढता दबाव ठिकठीकाणी आंदोलने
रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन दि. 15 जून 2026 पासून बुलढाणा येथे सुरू आहे. (Farmers' Loan Waiver Andolan) आंदोलनाला चौथा दिवस उजाडला तरी सुद्धा दखल घेतली जात नसल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांनी जाळपोळ झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.'अभी नही तो कभी नही' या निर्धाराने राज्यभरातील शेतकरी एकत्र येत असून सरकारवर दबाव वाढत आहे.