Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > शेती

वादळी वार्‍याने  शेतकऱ्यांना नुकसान

परभणीत पंचनामे सादर करण्यातबाबत कृषीमंत्र्यांचे अधिकार्‍यांना आदेश

Stormy Winds Damage: परभणी जिल्ह्यात वादळी पाऊस आणि वार्याने शेतकऱ्यांचे बागायती, केळी शेती आणि बिजलीचे पोल पडले. कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले.


परभणीत पंचनामे सादर करण्यातबाबत कृषीमंत्र्यांचे अधिकार्‍यांना आदेश

Stormy Winds Damage |

परभणी जिल्ह्यात वादळी वार्‍याने नुकसान; आ. विटेकर यांनी व्हिडीओ कॉलद्वारे मांडली वस्तुस्थिती

परभणी (Stormy Winds Damage) : जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पाऊस आणि वार्‍यामुळे मानवत तालुक्यातील पिंपळा व मांडेवडगाव, परभणी तालुक्यातील पोखर्णी, मांडाखळी,  इंदेवाडी , सुक्रेवाडी , व इतर परिसरातील अनेक शेतकर्‍यांच्या बागायती तसेच केळी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच बर्‍याच ठिकाणी विजेचे पोल सुद्धा पडले होते. या पार्श्वभूमीवर आ. राजेश विटेकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. व्हिडीओ कॉलद्वारे कृषीमंत्री दत्ता भरणे यांना वस्तुस्थिती दाखवली. तेव्हा कृषीमंत्र्यांनी  नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले.

आ. राजेश विटेकर यांनी रविवारी नुकसानग्रस्त भागातील शेतकर्‍यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या चेहर्‍यावरची चिंता आणि डोळ्यातील वेदना पाहून,  या संकटाच्या काळात त्यांना धीर देत संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना तात्काळ पंचनामे करून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच कृषी मंत्री दत्ता भरणे यांना केळी व (Stormy Winds Damage) इतर पिकांचे नुकसान थेट व्हिडीओ कॉल करून दाखवले. यावेळी उपस्थित तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना कृषी मंत्री बोलले.

शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या कष्टाचा सन्मान राखणे आणि संकटाच्या प्रत्येक क्षणी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही शासन व प्रशासन यांची नैतिक जबाबदारी आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लवकरात लवकर योग्य ती आर्थिक मदत मिळावी यासाठी तुम्ही तत्काळ पंचनामे करून शासनाकडे सादर करावेत, आताच कामाला लागा, असे कृषी मंत्री यांनी त्या अधिकार्‍यांना दिले स्पष्ट आदेश दिले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, पदाधिकारी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित विभागाचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

Related to this topic: