Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > शेती

शेतकरी ठिय्या आंदोलन

मसोड–असोलवाडी रस्ता मोजणीसाठी तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्यांचा ठिय्या

Farmers Thiya Andolan: कळमनुरी जवळील मसोड ते असोलवाडी मार्गावर शेतकऱ्यांनी सात वर्षांचा अतिरिक्त फेरा करण्याच्या अडचणीमुळे रस्ता बंद ठेवल्याने,


मसोड–असोलवाडी रस्ता मोजणीसाठी तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्यांचा ठिय्या

Farmers Thiya Andolan |

 

प्रशासन करीत होता मोजणी ला टाळाटाळ
आंदोलन कर्त्याचे संतप्त भूमिकेमुळे प्रशासनाने केली मोजणी

कळमनुरी (Farmers Thiya Andolan) : मसोडवरून असोलवाडी मार्गे कळमनुरीकडे जाणारा महत्त्वाचा बैलगाडी रस्ता काही शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अडवून ठेवल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्यामुळे मसोड, असोलवाडी व रामवाडी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीची अवजारे तसेच शेतमाल वाहतुकीसाठी तब्बल सात ते आठ किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

मसोड ते असोलवाडी शिवारापर्यंतचा हा रस्ता अनेक वर्षांपूर्वी डांबरीकरणासह पूर्ण करण्यात आला होता. मात्र केवळ तीन ते चारशे मीटर अंतर काही शेतकऱ्यांनी अडविल्याने हा रस्ता बारमाही वाहतुकीसाठी बंद पडला होता. याबाबत मसोड, असोलवाडी , रामवाडी येथील सरपंच, शेतकरी व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे अनेकवेळा निवेदने दिली होती. तसेच आंदोलनाच्या नोटीसाही देण्यात आल्या होत्या. तरीही महसूल प्रशासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

सततच्या पाठपुराव्यानंतर 18 मे रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर संबंधित रस्त्याची मोजणी करून तो मोकळा करण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र ठरलेल्या वेळेत मंडळ निरीक्षक व मोजणी कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने भर उन्हात ताटकळत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. मोजणी कर्मचाऱ्यांनी “वेळ नाही” असे सांगितल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट तहसील कार्यालय गाठत तहसीलदारांच्या दालनातच जमिनीवर ठिय्या आंदोलन सुरू केले.
या आंदोलनात नंदकिशोर तोष्णीवाल, उत्तम कुरवडे, उपसरपंच प्रकाश गिराम, अशोक भोजले, माजी सरपंच फकिरराव जांबुतकर, काळे, विलास भोसकर, प्रज्योत सातव, गजानन सातव, राऊत यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र “रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय उठणार नाही,” असा )Farmers Thiya Andolan_ पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अखेर तहसीलदारांनी मोजणी अधिकारी व नायब तहसीलदारांना तातडीने रस्त्याची मोजणी करून आखणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर नायब तहसीलदार बालाप्रसाद धूत, मंडळ निरीक्षक खोकले, तलाठी  फोपसे तसेच मोजणी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी म.रफिक व मोजणीदार यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष रस्त्याची मोजणी करण्यात आली. रस्त्याच्या खुणा कायम करून देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Related to this topic: