शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जफेडीच्या चिंतेतून कुरूंद्यात विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Farmer's suicide: कुरूंदा येथील ४० वर्षीय शेतकरी गजानन माणिकराव दळवी यांनी कर्जाच्या चिंतेतून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या शेतात नापिकी व आर्थिक अडचणींमुळे ही घटना घडली.

कर्जफेडीच्या चिंतेतून कुरूंद्यात विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Farmer's suicide

कुरूंदा (Farmer's suicide) : शेतातील नापिकी व कर्जाला कंटाळून ४० वर्षीय शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत कुरूंदा पोलिसात १ एप्रिलला आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कुरूंदा येथील गजानन माणिकराव दळवी (४०) या शेतकर्‍याला कुरूंदा शिवारात साडे चार एकर शेती असुन त्यावरच कुटूंबीयांची उपजिवीका चालते. या शेतीवर त्यांनी कुरूंदा शाखेतील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून २ वर्षापूर्वी १ लाख ४८ हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. मागील २ वर्षापासून नापिकीमुळे कर्ज कसे फिटावे अशी चिंता त्यांना लागली होती. यंदा त्यांनी शेतामध्ये केळीचे २ हजार झाडे लावली होती.

केळीचे घड विक्रीसाठी आले असताना आखाती युध्दामुळे केळीलाही दर मिळनेसा झाला. त्यामुळे व्यापार्‍यांनीही केळी विक्रीकडे पाठ फिरविली. या दरम्यान २ हजार केळीचे घड शेतातच पिकले. त्यातच सोयाबीन केवळ २ क्विंटल झाले. लागवडीचा खर्चही निघाला नसल्याने ते मागील काही दिवसापासून चिंतेत होते. यातच त्यांनी शेतामध्ये विषारी औषध पिले असता काही जणांच्या निर्दशनास येताच त्यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या (Farmer's suicide) प्रकरणी कुरूंदा पोलिसात कामाजी दळवी यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. पुढील तपास भगवा वडकिल्ले हे करीत आहेत. दरम्यान गजानन दळवी यांच्या पश्चात पत्नी,  एक मुलगा, एक मुलगी, आई - वडील, भाऊ असा परिवार आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026