शेतकरी जलसमाधी आंदोलन

गोळेगाव जवळील कॅनॉल मध्ये शेतकऱ्याची जलसमाधी आंदोलन

Former Jalasamadhi Andolan: गोळेगाव जवळील कॅनॉल मध्ये शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करून सिद्धेश्वर धरणातील पाणी केळी तलावात उपसा करण्याची मागणी केली.

गोळेगाव जवळील कॅनॉल मध्ये शेतकऱ्याची जलसमाधी आंदोलन

Former Jalasamadhi Andolan

 

सिद्धेश्वर धरणातील पाणी केळी तलावात उपसा करून टाकण्याची मागणी

औंढा नागनाथ (Former Jalasamadhi Andolan) : तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातील पाणी उपसा करून केळी तलावात सोडण्याच्या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील येळी, केळी, केळी तांडा, सावळी पार्डी, उंडेगाव, हिवरखेडा, साळणा, अनखळी, सावळी खुर्द या गावातील शेतकऱ्यांनी दिनांक ११ मे रोजी सकाळी ११ ते १२ वाजे दरम्यान गोळेगाव जवळून वाहणाऱ्या कॅनॉल मध्ये जलसमाधी आंदोलन केले व तात्काळ सिद्धेश्वर धरणातील पाणी उपसा करून केळी तलावात सोडण्याची मागणी लावून धरली यानंतर पूर्णा पाटबंधारे विभागाकडून वरिष्ठ स्तरावरून कारवाई सुरू असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तालुक्यातील सावळी पार्डी, केळी तांडा, केळी, हिवरखेडा, साळणा, अनखळी, सावळी खुर्द,येळी यासह अनेक गावच्या पिण्याच्या पाणी व शेती सिंचन केळी तलावावर अवलंबून आहे परंतु केळी तलाव दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीसच आटून जातो त्यामुळे या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण होतो तसेच शेतीही सिंचनाखाली राहत नाही त्यामुळे सिद्धेश्वर धरणातून पाणी उपसा करून केळी तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी या जलसमाधी आंदोलनाद्वारे केली.एकनाथ नागरे, गंगाराम घुगे, अमोल सांगळे ,बालाजी सांगळे, भास्कर आघाव ,निवास सांगळे ,विठ्ठल सांगळे ,संतोष मोरगे ,शुभम सांगळे, संतोष नागरे, गजानन कुटे, विश्वनाथ सांगळे, ननु खिलारे या १३ शेतकरी जलसमाधी आंदोलन केले.

यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी केळी तलावात पाणी उपलब्ध झाल्यास या (Former Jalasamadhi Andolan) गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो तसेच हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येते त्यामुळे तात्काळ सिद्धेश्वर धरणातून पाणी उपसा करत केळी तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली तसेच या जिल्ह्यातील पाणी पर जिल्ह्यात जात असल्याने व येथील शेतकरी पाण्यापासून वंचित राहत असल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. तात्काळ सिद्धेश्वर धरणातील पाणी केळी तलावात करून टाकण्यात आले नाही तर सिद्धेश्वर धरणाच्या १४ गेट वरून धरणात उड्या घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.

आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बी.डी बांगर यांनी भेट दिली होती. आंदोलना दरम्यान उपविभागीय अभियंता हिंगोली पूर्णा पाटबंधारे विभाग वसमत चे विक्रम पत्की, दप्तर कारकून जिरवणकर, सहाय्यक अभियंता पूर्णा पाटबंधारे शिवाजी मोळवंडे, कालवा निरीक्षक शिवकांत गिऱ्हे, कालवा निरीक्षक व्ही.एम.कुटे, एस एस घुगे,व्ही बी कुटे, जी एस काळे, यांची उपस्थिती होती यावेळी आंदोलन शेतकऱ्यांकडून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पोलीस प्रशासनाकडूनही पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस,पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, उपनिरीक्षक अमोल इंगोले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंजाब थिटे, जमादार दिलीप नाईक,जमादार संतोष पवार, जमादार गजानन गिरी, जमादार वसीम पठाण, शाहेद सय्यद, सुभाष जैताडे, रमेश मस्के, सुरेश ठाकरे,ओंकारेश्वर रांजणेकर,माधव सूर्यवंशी,ईकबाल शेख, राजकुमार कुटे, वसंत चव्हाण, जयदीप जाधव,अमोल चव्हाण, यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.

संबंधित सामग्री

मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा, अनेक प्रकल्प आटण्याच्या मार्गावर

मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा, अनेक प्रकल्प आटण्याच्या मार्गावर

मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा शिल्लक. सिद्धेश्वर, सीना-कोळेगाव शून्यावर; जायकवाडी 77.08% तर मांजरा 10% वर.

Oct 02, 2026
कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफीची रक्कम मिळूनही IOB एकलारा शाखेतील २८८ शेतकऱ्यांची खाती बंद नाहीत. नवीन पीक कर्जासाठी चार तास ठिय्या आंदोलनानंतर तातडीच्या कार्यवाहीचे आदेश.

Sep 26, 2026
शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

तावशीतील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तासन्‌तास उन्हात थांबले; भेट न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत करपलेल्या पिकांची होळी केली.

Sep 24, 2026
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषद; धान खरेदी, नुकसानभरपाई, महामार्ग व रोजगाराच्या मागण्या.

Sep 18, 2026
नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

धान बोनस, ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर आणि २४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात नागभीडमध्ये हजारो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा.

Sep 17, 2026