Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > शेती

शेतकरी संघटना आंदोलन

परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 'जोडे मारो' आंदोलन; केंद्र सरकारविरोधात संताप

Farmers' Organization Protest: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी केंद्र सरकारविरोधात 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील विद्यार्थी व शेतकरी आंदोलनांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध


परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जोडे मारो आंदोलन केंद्र सरकारविरोधात संताप

Farmers' Organization Protest |

 

दिल्लीतील विद्यार्थी-शेतकरी आंदोलनावरील पोलिस कारवाईचा निषेध
केंद्र सरकारच्या पुतळ्याला जोडे मारून केला निषेध

परभणी (Farmers' Organization Protest) : शहराच्या शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी केंद्र सरकारविरोधात 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील विद्यार्थी व शेतकरी आंदोलनांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या पुतळ्याला जोडे मारून घोषणाबाजी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Farmers' Organization Protest) वतीने बुधवारी (२२ जुलै) केंद्र सरकारविरोधात 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील विद्यार्थी आणि शेतकरी आंदोलनांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध नोंदवत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या पुतळ्याला जोडे मारून संताप व्यक्त केला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. मात्र, त्यांच्या मागण्यांवर सरकारने कोणतीही दखल न घेता त्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला.

तसेच, विद्यार्थी आणि पालकांनी संसद भवनावर शांततेत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी लाठीमार, अश्रुधूराचा वापर केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. दुसरीकडे, विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना किसान घाट येथे आंदोलन करण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करत केंद्र सरकारवर शेतकरीविरोधी धोरणे राबविल्याचा आरोप करण्यात आला.

या (Farmers' Organization Protest) घटनांच्या निषेधार्थ परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी किशोर ढगे, सय्यद कलीम, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, माऊली शिंदे, विकास भोपळे, गजानन दुघाणे, मुंजा लोडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.