21 एप्रिल पासून कर्मचारी व शिक्षक बेमुदत संपावर !

राज्य शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणास्तव राज्यातील कर्मचारी व शिक्षक 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर जाणार आहे.

21 एप्रिल पासून कर्मचारी व शिक्षक बेमुदत संपावर !

Employees Strike

हिंगोली (Employees Strike) : राज्य शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणास्तव राज्यातील कर्मचारी व शिक्षक 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भात आज जिल्हा शाखेच्या वतीने शासनाला निवेदन सादर करण्यात आले.

सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देत योजना जाहीर केली होती. परंतु याबाबत कुठलीही अधिसूचना परिपत्रक अद्याप पर्यंत काढण्यात आलेले नाही. परिणामी 1 मार्च 2024 च्या नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे पेन्शनचे प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना भरती रेंगाळलेली आहे. पदोन्नती प्रक्रिया देखील थांबल्यामुळे जेष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. शासनाने विशेष बाब म्हणून अनुकंपा तत्त्वावरील सर्व प्रतीक्षा यादी एकाच वेळी निकाली काढावी. ज्यामुळे वयोमर्यादित अनेकांना न्याय मिळेल. या व अशा इतर अनेक मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी व शिक्षक 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. याबाबत आज मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप कदम, संजीवनी शिंदे, गोपाल कंठे, पी.बी. खडसे, आर.बी. नरवाडे, राजेश खुडे, जनक गारोळे, रामप्रसाद चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.

संबंधित सामग्री

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026
हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोलीतील राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीआधारे १३ कोटी ३४ लाख ९१ हजार ८८२ रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. ६७८ प्रकरणांचा निपटारा झाला.

Sep 13, 2026