Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > शेती

दर्यापूर बाजार समिती

चाकूचा धाक धाकून ट्रक सहित शेतमाल लंपास

Daryapur Bazar Samiti: दर्यापूर बाजार समितीत एका ट्रक मालकाला चाकूचा धाक दाखवून 250 क्विंटल तूरं चोरीला गेल्याची घटना. लोहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.


चाकूचा धाक धाकून ट्रक सहित शेतमाल लंपास

Daryapur Bazar Samiti |

दर्यापूर बाजार समितीत विकला शेत माल

यवतमाळच्या लोहारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

दर्यापूर (Daryapur Bazar Samiti) : एका ट्रक मालकाला चाकूचा धाक दाखवून थेट एमआयडीसी परिसरातून ट्रक सहित 250 क्विंटल तूरं लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेसंदर्भात यवतमाळच्या लोहारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तक्रारीआधारे गुन्ह्याचा तपास सुरू केला असता सदर शेतमाल तूर 250 क्विंटल विविध (Daryapur Bazar Samiti) बाजार समितीमध्ये आरोपींनी विकल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

लोहरा पोलिसांनी या घटने संदर्भात सखोल तपास केला असता दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्या आरोपीकडून विचारपूस केल्यानंतर काही शेतमाल हा मुर्तीजापूर,कारंजा व दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे टोळे ट्रेडर्स यांच्याकडे विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे तर या आरोपींनी आणखी सुद्धा बाजार समितीमध्ये चोरीचा शेतमाल हा विकला असल्याचे उघडकीस आले आहे. जवळपास 20 लाखाचा मुद्देमाल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दर्यापूर बाजार समितीत (Daryapur Bazar Samiti) गुरवारी दुपारी लोहारा पोलीस स्टेशन दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी व्यापारी अडते व शेतकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. तपास पूर्ण होईपर्यंत आरोपीची नावे प्रसिद्ध करण्यात येणार नसल्याची माहिती लोहारा पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली आहे. दर्यापूर बाजार समितीत याआधी सुद्धा अशाप्रकारे चोरीचा किती शेतमाल विक्रीला आला याचा शोध आता बाजार समिती लावणार का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.