Hingoli sugarcane cart stolen: हिंगोली जिल्ह्यातील पळसोना शिवारात ऊस वाहतूकीसाठी वापरलेली 2.40 लाखांची डंपिंग गाडी 27 मे ते 28 मे दरम्यान चोरली गेली. पोलीसने गुन्हा दाखल केला आहे,
हिंगोली (Hingoli sugarcane cart stolen) : हिंगोली जिल्ह्यातील पळसोना शिवारातून ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी 2 लाख 40 हजार रुपये किमतीची डंपिंग गाडी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दत्ताराव बळीराम पवार, रा. पळसोना, ता. जि. हिंगोली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी त्यांची भगव्या पिवळ्या रंगाची ऊस वाहतुकीची डंपिंग गाडी पळसोना शेत शिवारातील सर्व्हे नंबर 36/03 येथील पत्र्याच्या शेडजवळ उभी करून ठेवली होती. गाडीवर 'इंडियन वर्क शॉप' असे लिहिलेले आहे.
दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 28 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास या (Hingoli sugarcane cart stolen) कालावधीत अज्ञात चोरट्याने सदर गाडी चोरून नेली. ही बाब फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आज, 1 जून रोजी बासंबा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पंडीत यलाप्पा सोळंके, रा. पातोंडा, ता. जि. हिंगोली याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा 1 जून रोजी सायंकाळी दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मदन गव्हाने करत आहेत.