बुलढाणा जिल्हा कोरडा दुष्काळ

बुलढाणा जिल्ह्यात सरसकट नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांसह देविदास कणखर, विनायक सरनाईक यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

Buldhana district dry drought: जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

बुलढाणा जिल्ह्यात सरसकट नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांसह देविदास कणखर, विनायक सरनाईक यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

Buldhana district dry drought

 

जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषित करण्यासह सरसकट नुकसानभरपाई देण्याचे पालकमंत्री यांचे शेतकऱ्यांना आश्वासन;
आठवडाभरात निर्णय न झाल्यास शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

चिखली (Buldhana district dry drought) : जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली.भेटीसाठी उपस्थित असलेले पदाधिकारी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्यासह नितीन राजपूत, गणेश थुट्टे, मुरलीधर येवले, गोपाल ढोरे, विनोद थुट्टे औचितराव वाघमारे, गणेश गारोळे यांच्यासमवेत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांना चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यात समावेश करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत आहेत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका यांसह खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम झाला असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत देण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली होती.

दोन दिवसांच्या आंदोलनानंतर पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने चिखली येथे दोन दिवस आंदोलन करण्यात आले. यामध्ये ‘शेतकऱ्यांच्या बांधावर या, केवळ बैठका नको’ अशी भूमिका घेत पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन परिस्थिती पाहावी, अशी मागणी करण्यात आली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चिखलीत ‘काजू-बदाम घ्या, पण शेतकऱ्यांच्या बांधावर या’ अशा आशयाचे आंदोलनही करण्यात आले होते. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी पालकमंत्र्यांनी बांधावर यावे, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली होती.यावेळी आमदार श्वेताताई महाले, आमदार मनोज कायंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून सकारात्मक प्रतिसाद...

आज पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा दुष्काळात समावेश करून सरसकट नुकसानभरपाई देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचे विनायक सरनाईक व देविदास कणखर यांनी सांगितले. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, पीक नुकसान लक्षात घेऊन सरसकट नुकसानभरपाई द्यावी आणि दुष्काळाच्या निकषात जिल्ह्याचा समावेश करावा, या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“आठवडाभरात ठोस निर्णय न झाल्यास शेतकरी संघटना पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात उतरेल,” असा इशाराही देविदास कणखर, विनायक सरनाईक यांनी दिला आहे.

जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन...

बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana district dry drought) पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली आहेत. चिखली येथे दोन दिवस आंदोलन करण्यात आले, तर लोणारसह जिल्ह्यातील इतर भागांतही शेतकरी संघटना व शेतकऱ्यांकडून दुष्काळ, नुकसानभरपाई, कर्जमाफी आणि पीकविमा यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलने करण्यात आली आहेत.

संबंधित सामग्री

शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी जि.प.च्या महिला शिक्षिका बळीराजाच्या बांधावर

शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी जि.प.च्या महिला शिक्षिका बळीराजाच्या बांधावर

Hingoli Dry Drought: हिंगोली जिल्ह्यात मागील २० दिवसात १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना, कोरड्या दुष्काळामुळे हतबल झालेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी जि प महिला शिक्षिका शेतकऱ्यांच्या बांधावर

Oct 02, 2026
महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुलीवर निर्बंध, 43 तालुक्यांचा समावेश आणि रोजगार हमी योजनेसाठी 6,728 कोटींचा निधी.

Oct 01, 2026
मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

बुलढाण्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त यादीत; ‘ट्रिगर-१’ लागू. आमदार चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश.

Sep 26, 2026
मानोरा तालुक्यातील सर्व ६ महसूल मंडळात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करा; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मानोरा तालुक्यातील सर्व ६ महसूल मंडळात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करा; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Manora Taluka Dry Drought: मानोरा तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प व अनियमित राहिल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले..

Sep 24, 2026
उद्या कोरड्या दुष्काळाचा जीआर; शेतकऱ्यांना सरसकट मदत, फडणवीसांची मोठी घोषणा

उद्या कोरड्या दुष्काळाचा जीआर; शेतकऱ्यांना सरसकट मदत, फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्या कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Sep 24, 2026