Breaking News
  • तुकाराम मुंढे नांदेडला आल्याची अफवा, भीतीपोटी पान टपऱ्या बंद करून , टपरी चालक पसार
  • तुळजापुरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात नागरिकांचे साखळी उपोषण; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
  • वाशिम शहरात आनंदाचे वातावरण... प्रचंड उकाड्यापासून वाशिमकरांना काहीसा दिलासा
  • अमरावती शहरात सलग तीसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी
  • आकाशवाणी पुणे केंद्राचा वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या चर्चेमुळे चिंता वाढली
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी न्यायालय 20 तारखेला देणार निकाल
  • नंदूरबारमध्ये सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने मारली विहिरीत उडी
  • आय टी पार्क हिंजवडीत मद्यधुंद तरुणांच्या आलीशान कारने दुचाकीला उडवले
  • सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणांशिवाय आणि निर्धारित नियमांचे उल्लंघन करून नालेसफाईच्या कामावर तैनात केले जात असल्याची तक्रार दाखल झाल्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

होम > देश

सुरतमध्ये थरारक खून; पत्नीचा मृतदेह पेटीत लपवून सिमेंटने झाकला!

गुजरातमधील सुरत येथे एका 39 वर्षीय आहारतज्ज्ञ महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


सुरतमध्ये थरारक खून पत्नीचा मृतदेह पेटीत लपवून सिमेंटने झाकला

Surat murder |

सुरत (Surat murder) : गुजरातमधील सुरत येथे एका 39 वर्षीय आहारतज्ज्ञ महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतदेह लपवण्यासाठी तो लाकडी पेटीत ठेवून त्यावर माती व सिमेंट टाकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत महिलेचे नाव शिल्पा सालवे असून तिचा पती विशाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या भीषण हत्येमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

शिल्पा पूर्वी सुरत म्युनिसिपल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत होती. नंतर तिने स्वतःचा क्लिनिक सुरू केला होता. तर तिचा पती विशाल हा डायमंड पॉलिशिंग कारखान्यात काम करत होता, मात्र गेल्या सुमारे आठ वर्षांपासून तो बेरोजगार होता.

काही दिवसांपूर्वी विशालने पोलिसांत शिल्पा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याने एक चिठ्ठी ठेवून घर सोडले. या चिठ्ठीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, विशाल आणि शिल्पामध्ये वारंवार वाद होत होते. विशालला शिल्पावर परपुरुषाशी संबंध असल्याचा संशय होता. शिल्पा मोबाईल तपासू देत नसल्याने दोघांमध्ये भांडणं वाढली होती. या दाम्पत्याला 13 आणि 8 वर्षांची दोन मुले आहेत.

चिठ्ठीत विशालने लिहिले आहे की, “काही वर्षे आनंदाने संसार केल्यानंतर माझ्या पत्नीच्या वागण्यात बदल झाला. आमच्यात सतत वाद होत होते. या सगळ्याला कंटाळून आणि सहन न झाल्याने मी हा गुन्हा केला. यात इतर कोणीही जबाबदार नाही. 20 एप्रिल रोजी मी हा गुन्हा करून तिचा मृतदेह सलबतपुरा येथील माझ्या वडिलोपार्जित घरात लपवला.”

शिल्पाच्या वडिलांनी प्रदीप कोस्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विशालविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कोस्ता यांनी पोलिसांना सांगितले की, शिल्पा आणि विशाल यांचा विवाह 2010 मध्ये झाला होता.

विशाल बेरोजगार असल्यामुळे घरातील सर्व जबाबदारी शिल्पावर होती, यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. कोस्ता हे छत्तीसगडमध्ये राहतात आणि त्यांनी अनेक वेळा सुरतला येऊन दोघांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता.

21 एप्रिल रोजी त्यांनी शिल्पाला फोन केला असता तिचा मोबाईल बंद होता. विशालने तिला रुग्णालयातून परत न आल्याचे सांगितले. यामुळे संशय आल्याने कोस्ता तातडीने सुरतला पोहोचले. त्यांनी जावयाला विचारणा केली, मात्र त्याने टाळाटाळ केली.

दरम्यान, विशालने एका नातेवाईकाच्या फोनवर कबुलीजबाबाची चिठ्ठी पाठवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला नंतर ताब्यात घेतले.

पोलिसांनी सांगितले की, या चिठ्ठीच्या आधारे ते सलबतपुरा येथील घरात पोहोचले. घराच्या पहिल्या मजल्यावर लाकडी पेटीत माती आणि सिमेंटमध्ये झाकलेला शिल्पाचा मृतदेह आढळून आला.

पोलीस निरीक्षक आर. ए. जडेजा यांनी सांगितले की, “सुमारे 4.5 चौरस फूट लाकडी पेटीत मृतदेह लपवण्यात आला होता. त्यावर पाणी टाकले नव्हते. आरोपीने चिठ्ठीत गुन्ह्याची कबुली दिली असून पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याचे नमूद केले आहे. 20 एप्रिल रोजी त्याने शिल्पाला बाइकवरून सलबतपुरा येथील घरी नेले आणि गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह लपवला.”

Related to this topic: