Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > देश

Ruchika Singh

'माझ्याकडून मोठी चूक झाली'; मोदींविरोधातील वक्तव्यावर १५ वर्षीय रुचिका सिंहची जाहीर माफी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या १५ वर्षीय रुचिका सिंह हिने आता सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे.


माझ्याकडून मोठी चूक झाली मोदींविरोधातील वक्तव्यावर १५ वर्षीय रुचिका सिंहची जाहीर माफी

जंतर मंतर आंदोलनातील व्हायरल व्हिडिओनंतर हात जोडून व्यक्त केला पश्चात्ताप; नोएड्यात यापूर्वीच गुन्हा दाखल

नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या १५ वर्षीय रुचिका सिंह हिने आता सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. तिचा हात जोडून माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रुचिका सिंह स्वतःचे वय १५ वर्षे असल्याचे सांगते. ती कनॉट प्लेस येथे फिरण्यासाठी गेली होती आणि त्यानंतर मित्र-मैत्रिणींसोबत आंदोलनस्थळी पोहोचल्याचे सांगते. तेथील वातावरण आणि उपस्थित लोकांच्या प्रभावाखाली येऊन आपण ती वक्तव्ये केली, असे तिने मान्य केले आहे.

तिने पुढे सांगितले की, आपण केलेले वक्तव्य अजिबात योग्य नव्हते आणि ते माफ करण्याजोगेही नाही. "माझ्याकडून मोठी चूक झाली. ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे. मला माझ्या कृत्याची लाज वाटते. देशाने मला माफ करावे," असे म्हणत तिने दिलगिरी व्यक्त केली.

दरम्यान, शुक्रवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आंदोलनादरम्यान आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या आणि शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ करत असल्याचे जाहीर केले होते. स्वतःबद्दल आणि आपल्या दिवंगत आई-वडिलांबाबत वापरण्यात आलेले शब्द वेदनादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, तरुणांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची संधी मिळाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी, पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी २९ जुलै रोजी नोएडा येथील एक्स्प्रेस वे पोलीस ठाण्यात रुचिका सिंहविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे आणि जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, रुचिका सिंह ही तिच्या आईसोबत नोएड्यातील एका सोसायटीमध्ये राहत असल्याची माहिती आहे. मात्र आंदोलनानंतर ती परत न आल्याने तिचा फ्लॅट बंद असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकांनी सांगितले. या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांनी संबंधित सोसायटीत जाऊन रहिवाशांकडून चौकशीही केली आहे.

Related to this topic: