प्रदाक्ष फाउंडेशन

दिल्लीतील 'प्रदाक्ष' फाउंडेशनच्या कार्यक्रमात यशस्वी ओबीसी अधिकाऱ्यांचा गौरव

Pradaksh Foundation: दिल्लीत 'प्रदाक्ष' फाउंडेशनमध्ये आयोजित सत्कार सोहळ्यामध्ये ओबीसी प्रवर्गातून आयएएस, आयपीएस व आयआरएस पदवीधरांचा सन्मान करण्यात आला.

दिल्लीतील 'प्रदाक्ष' फाउंडेशनच्या कार्यक्रमात यशस्वी ओबीसी अधिकाऱ्यांचा गौरव

Pradaksh Foundation

रामराव वडकुते यांच्या हस्ते सत्कार, केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी व मान्यवरांची उपस्थिती

नवी दिल्ली (Pradaksh Foundation) : दिल्ली येथील "प्रदाक्ष" फाउंडेशनमध्ये आयोजित विशेष सत्कार सोहळ्यात 'ऑल इंडिया यादव महासभे'च्या वतीने आयोजकांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात ओबीसी प्रवर्गातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयएएस, आयपीएस व आयआरएस पदांवर निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

भाजपाचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्या शुभहस्ते यशस्वी अधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना खा. वडकुते म्हणाले, "ओबीसी समाजातील युवकांनी कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर देशसेवेच्या सर्वोच्च पदांवर स्थान मिळवले आहे. हे यश संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. 'प्रदाक्ष' सारख्या संस्था अशा गुणवंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात, हे कौतुकास्पद आहे.
 
या (Pradaksh Foundation) सोहळ्यास केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी जी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. बिहारमधील बांका लोकसभा मतदारसंघाच्या त्या खासदार आहेत. त्यांच्यासोबत श्री गिरधारी लाल यादव जी, खासदार, तसेच मध्य दिल्लीचे पोलीस उपआयुक्त श्री रोहित यादव जी यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय ओबीसी समाजातील अनेक तरुण अधिकारी, प्रशासकीय सेवेतील मान्यवर आणि 'ऑल इंडिया यादव महासभे'चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना सांगितले, "प्रशासनात ओबीसी समाजाचा वाढता सहभाग हा सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या अधिकाऱ्यांनी तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवाव्यात, हीच अपेक्षा."

'प्रदाक्ष' फाउंडेशनचे योगदान  

'प्रदाक्ष' फाउंडेशन (Pradaksh Foundation) गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ओबीसी व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व संसाधने उपलब्ध करून देत आहे. संस्थेच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी झाले आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'ऑल इंडिया यादव महासभे'च्या सदस्यांनी 'प्रदाक्ष' फाउंडेशनचे संस्थापक व कार्यकर्त्यांचे स्वागत करून आभार मानले. सत्कारमूर्ती अधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन आणि 'प्रदाक्ष' सारख्या संस्थांना दिले. पोलीस उपआयुक्त रोहित यादव यांनी नवोदित अधिकाऱ्यांना क्षेत्रीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

संबंधित सामग्री

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने गौरव केला. विकास, कल्याण, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जागतिक भूमिकेचा ठरावात उल्लेख.

Oct 07, 2026
उदगीरच्या दूध डेअरीला ‘हिरवा कंदील’; दुसऱ्या धवलक्रांतीचा मार्ग मोकळा!

उदगीरच्या दूध डेअरीला ‘हिरवा कंदील’; दुसऱ्या धवलक्रांतीचा मार्ग मोकळा!

Udgir's milk dairy: वर्षानुवर्षे बंद असलेल्या उदगीरच्या शासकीय दूध डेअरीच्या पुनरुज्जीवनाला अखेर महत्त्वाचे वळण मिळाले आहे. उदगीर येथील शासकीय दूध डेअरीच्या अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026