Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > देश

Ram Charan

राम चरणच्या मनगटावर यशस्वी शस्त्रक्रिया; 'पेद्दी'च्या ॲक्शन सीनमधील दुखापतीनंतर प्रकृतीत वेगाने सुधारणा

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राम चरणच्या प्रकृतीबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे.


राम चरणच्या मनगटावर यशस्वी शस्त्रक्रिया पेद्दीच्या ॲक्शन सीनमधील दुखापतीनंतर प्रकृतीत वेगाने सुधारणा

कोईम्बतूरच्या गंगा हॉस्पिटलमध्ये सर्जरी पार; पूर्णपणे बरे झाल्यानंतरच पुन्हा चित्रिकरणाला सुरुवात

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राम चरणच्या प्रकृतीबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या उजव्या मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आता त्याच्या मनगटावरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून तो सध्या जलद गतीने बरा होत असल्याची माहिती त्याच्या टीमकडून देण्यात आली आहे.

राम चरणला 'पेद्दी' (Peddi) चित्रपटाच्या एका थरारक ॲक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान उजव्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर इतर शूटिंगदरम्यानही त्याला त्रास जाणवत असल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

यानंतर त्याला कोईम्बतूर येथील प्रसिद्ध गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने लॅपरोस्कोपिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. ही सर्जरी यशस्वी झाल्याचे त्याच्या टीमने स्पष्ट केले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात आले आहे.

उपचाराच्या संपूर्ण काळात राम चरणच्या कुटुंबीयांनी त्याला साथ दिली. वडील चिरंजीवी, आई सुरेखा आणि पत्नी उपासना हे रुग्णालयात त्याच्यासोबत उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याला संबंधित हातावर अधिक ताण न देण्याचा आणि पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पूर्णपणे फिट झाल्यानंतरच राम चरण पुन्हा चित्रिकरणाला सुरुवात करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Related to this topic: