Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > देश

Rahul Gandhi

जोपर्यंत भ्रष्ट शिक्षणमंत्री प्रधान यांना बर्खास्त केले जात नाही, तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही- राहुल गांधी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.


जोपर्यंत भ्रष्ट शिक्षणमंत्री प्रधान यांना बर्खास्त केले जात नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही- राहुल गांधी

Rahul Gandhi |

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्ला

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जनंतर विरोधी पक्षांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, NEET पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी निश्चित करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.

या मुद्द्याचे पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहांतही उमटले आहेत. NEET पेपरफुटी प्रकरण आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावरून विरोधकांनी सातत्याने गदारोळ केल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घेतला जावा. या दोन मागण्या पूर्ण होईपर्यंत संसदेत किंवा संसदेबाहेर कोणतीही चर्चा होऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद परिसरात आंदोलनही केले. शिक्षणमंत्र्यांनी पदाचा राजीनामा देईपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू देणार नसल्याचा निर्धार विरोधकांनी व्यक्त केला आहे.

Related to this topic: