Polymer Banknotes India

₹10 आणि ₹20 च्या नोटांमध्ये मोठा बदल? पॉलिमर नोटांच्या फील्ड ट्रायलला केंद्राची मंजुरी

भारतातील चलन व्यवस्थेत आगामी काळात महत्त्वाचा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

₹10 आणि ₹20 च्या नोटांमध्ये मोठा बदल? पॉलिमर नोटांच्या फील्ड ट्रायलला केंद्राची मंजुरी

Polymer Banknotes India

दोन्ही मूल्यांच्या एकूण 100 कोटी पॉलिमर नोटांची चाचणी होणार; कागदी नोटा तातडीने बंद होणार नाहीत, RBIकडून स्पष्टता

भारतातील चलन व्यवस्थेत आगामी काळात महत्त्वाचा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ₹10 आणि ₹20 मूल्याच्या पॉलिमर नोटांच्या फील्ड ट्रायलला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या दोन्ही मूल्यांच्या एकूण 100 कोटी पॉलिमर नोटांची चाचणी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, या प्रक्रियेनंतर पॉलिमर नोटा नियमित चलनात आणण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या शिफारशीच्या आधारे तसेच RBI Act, 1934 मधील कलम 25 अंतर्गत पॉलिमर नोटांच्या फील्ड ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे.

कागदी ₹10 आणि ₹20 च्या नोटा बंद होणार?

पॉलिमर नोटांच्या चाचणीला मंजुरी मिळाल्याने सध्याच्या कागदी नोटा बंद होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार ₹10 आणि ₹20 च्या कागदी नोटा तातडीने चलनातून बाद केल्या जाणार नाहीत.

सध्या पॉलिमर नोटा कागदी नोटांची जागा घेण्यासाठी नव्हे, तर त्यांच्यासोबत चलनात आणण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे. फील्ड ट्रायल यशस्वी झाल्यानंतर या मूल्यांच्या पॉलिमर नोटा नियमितपणे जारी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

मात्र, पॉलिमर नोटा प्रत्यक्ष चलनात कधीपासून उपलब्ध होतील, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. RBIकडून नोटांच्या छपाईची प्रक्रिया अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पॉलिमर नोटांचा नेमका फायदा काय?

पॉलिमरपासून तयार केलेल्या नोटा कागदी चलनाच्या तुलनेत अधिक टिकाऊ मानल्या जातात. पाणी, धूळ आणि दैनंदिन वापरामुळे त्यांचे नुकसान तुलनेने कमी होते. त्या सहज फाटत नसल्याने दीर्घकाळ वापरता येऊ शकतात.

याशिवाय पॉलिमर शीटवर आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करणे तुलनेने सोपे असल्याने बनावट नोटांच्या समस्येला आळा घालण्यासही मदत होऊ शकते. कागदी नोटा वारंवार खराब होत असल्याने त्यांच्या छपाईसाठी मोठा खर्च करावा लागतो.

मिळालेल्या माहितीनुसार, FY25 मध्ये RBIने कागदी नोटांच्या छपाईसाठी ₹6,372.8 कोटी खर्च केले. त्यामुळे अधिक टिकाऊ चलनाचा पर्याय म्हणून पॉलिमर नोटांकडे पाहिले जात आहे. मात्र, सध्या संपूर्ण प्रक्रिया फील्ड ट्रायलच्या टप्प्यावर असल्याने या नोटा प्रत्यक्ष व्यवहारात येण्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो.

संबंधित सामग्री

सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये कायदेशीर पेच

सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये कायदेशीर पेच

केंद्रीय बँकिंग नियमन अधिनियम (BR Act) आणि महाराष्ट्र राज्य सहकार कायदा यांमधील विसंगतीमुळे राज्यातील सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये मोठा कायदेशीर गोंधळ उडाला आहे.

Aug 26, 2026
RBI ची मोठी घोषणा! रेपो दर कायम, EMI वाढणार की कमी होणार?

RBI ची मोठी घोषणा! रेपो दर कायम, EMI वाढणार की कमी होणार?

देशातील कोट्यवधी बँक ग्राहक, गृहकर्जधारक आणि विविध प्रकारच्या कर्जांचा लाभ घेणाऱ्यांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे.

Jun 05, 2026