Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > देश

PM मोदी व्हिडिओ

मोठी बातमी! फेसबुकवरून थेट PM मोदींचाच व्हिडिओ हटवला...

PM Modi Video Removed: तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरील एक महत्त्वाचा व्हिडिओ अचानक गायब झाल्याने मोठी चर्चा सुरू झाली. हा व्हिडिओ हटवण्यात आल्याने विविध स्तरातून प्रतिक्रिया


मोठी बातमी फेसबुकवरून थेट pm मोदींचाच व्हिडिओ हटवला

PM Modi Video |

नवी दिल्ली (PM Modi Video Removed) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरील एक महत्त्वाचा व्हिडिओ अचानक गायब झाल्याने मोठी चर्चा सुरू झाली. हा व्हिडिओ हटवण्यात आल्याने विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. मात्र, प्रकरणाची दखल घेत Meta ने स्पष्टीकरण देत हा प्रकार कोणत्याही कायदेशीर आदेशामुळे किंवा धोरणाच्या उल्लंघनामुळे नव्हे, तर तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगितले.

28 जुलैला व्हिडिओ अचानक गायब

23 जुलै रोजी अपलोड करण्यात आलेल्या या (PM Modi Video) व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी आणि तरुणांना संबोधित केले होते. परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कायदे करण्याबाबत त्यांनी भाष्य केले होते. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता. मात्र, 28 जुलैच्या सकाळी तो फेसबुकवर उपलब्ध नसल्याचे आढळून आले.

'कायदेशीर निर्बंध'चा संदेश दिसल्याने वाद

व्हिडिओ (PM Modi Video) उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही युजर्सना "कायदेशीर विनंतीमुळे या मजकुरावरील प्रवेश मर्यादित करण्यात आला आहे" असा संदेश दिसल्याचे सांगण्यात आले. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आणि या प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

Meta चे स्पष्टीकरण

Meta ने या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना, व्हिडिओ (PM Modi Video) हटवण्यामागे कोणताही कायदेशीर आदेश किंवा धोरणाचे उल्लंघन नसून, तो तांत्रिक त्रुटीचा परिणाम असल्याचे स्पष्ट केले.

सरकारकडून माहिती मागवण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सरकारकडून दखल घेण्यात आली असून, संबंधित परिस्थितीची माहिती घेण्यासाठी Meta च्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले जाऊ शकते. तसेच या (PM Modi Video) घटनेची सविस्तर चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.