Pellet Gun Case

पेलेट गन प्रकरणावर राहुल गांधी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पेलेट गनच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पेलेट गन प्रकरणावर राहुल गांधी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

जंतर मंतर आंदोलनातील जखमी विद्यार्थी साहिल लोचवला घेऊन पोहोचले राहुल गांधी; FIR दाखल होईपर्यंत न हटण्याचा इशारा

जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पेलेट गनच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणाच्या तपासाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली पोलिसांकडे थेट जाब विचारला. आज त्यांनी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाणे आणि DCP कार्यालयाला भेट देत कारवाईची माहिती घेतली. मात्र, FIR दाखल करण्यात आलेली नसल्याने राहुल गांधी यांनी DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.

या भेटीदरम्यान पेलेट गनच्या वापरामुळे जखमी झालेला विद्यार्थी साहिल लोचव यालाही राहुल गांधी सोबत घेऊन गेले होते. त्यांनी दिल्ली पोलिसांकडून आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेतली. तसेच या प्रकरणात कोणती कारवाई करण्यात आली, याबाबतही पोलिसांना प्रश्न विचारले.

राहुल गांधी यांनी FIR दाखल करण्याची मागणी लावून धरली. जोपर्यंत या प्रकरणात FIR नोंदवली जात नाही, तोपर्यंत आपण घटनास्थळावरून जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.

जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनच्या वापराचा आरोप

२० जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने NEET पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात देशभरातील मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. आंदोलकांना पांगवताना दिल्ली पोलिसांनी पेलेट गनचा वापर केल्याचा आरोप आहे. या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात आले असून, काही जखमी विद्यार्थ्यांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.

NEET पेपरफुटीसह अन्य परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनांनंतर विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

सुप्रीम कोर्टाच्या समितीकडून चौकशी

पेलेट गनच्या वापरासह विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या कथित पोलिस अत्याचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पाच सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. माजी न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.

ही समिती २० जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर तसेच देशाच्या इतर भागांत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलिस अत्याचार, लाठीचार्ज, गैरवर्तन, हिंसाचार आणि गंभीर दुखापतींच्या आरोपांची चौकशी करणार आहे.

दरम्यान, विद्यार्थी आंदोलकांवर पेलेट गनचा वापर झाल्याच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राहुल गांधी यांच्या आजच्या आंदोलनामुळे या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या तपासाची आणि FIR नोंदवण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.

संबंधित सामग्री

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026