Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > देश

Parliament Protest

NEET आंदोलनावरून राहुल गांधी आक्रमक; मोदी निवासाबाहेर धरणे आंदोलन

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.


neet आंदोलनावरून राहुल गांधी आक्रमक मोदी निवासाबाहेर धरणे आंदोलन

Parliament Protest |

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन; विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून देशवासीयांना राहुल गांधींचे सहभागी होण्याचे आवाहन

नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीत संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारानंतर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू करत सरकारकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा केवळ आंदोलनकर्त्यांपुरता मर्यादित नसून तो देशातील प्रत्येक भारतीय कुटुंबावर झालेला हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणात उत्तर न देता किंवा कोणताही निर्णय न घेता सरकार जबाबदारीतून सुटू शकते, असा समज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून घेऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.

"यावेळी तसे होणार नाही, आता तर अजिबातच नाही," अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारला थेट इशारा दिला. विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात सरकारला भूमिका स्पष्ट करावीच लागेल, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

याशिवाय, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा असे वाटणाऱ्या प्रत्येक देशभक्त भारतीयाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या आवाजाला बळ द्यावे, असे सांगतानाच भारतीय विद्यार्थ्यांचा आवाज दुर्लक्षित करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related to this topic: