प्रशासकीय उदासीनतेमुळे १२ ते १५ मंदिरे पाण्याखाली जाण्याची भीती;
वन विभागाच्या आडमुठ्या धोरणावर ओढले ताशेरे
लोणार (MLA Siddharth Kharat) : जागतिक वारसा स्थळ असलेल्या लोणार सरोवराची पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने परिसरातील प्राचीन मंदिरे पाण्याखाली जात आहेत. या गंभीर विषयावर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात (MLA Siddharth Kharat) यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत सरकारचे लक्ष वेधले. प्रशासकीय अधिकार्यांच्या उदासीनतेमुळे आणि वन विभागाच्या परवानग्या रखडल्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे नुकसान होत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला.
मंदिरांच्या मूर्तींच्या नाकापर्यंत पाणी
आमदार सिद्धार्थ खरात (MLA Siddharth Kharat) यांनी सभागृहात सांगितले की, “५२ हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेल्या या सरोवराला जागतिक दर्जा आहे. मात्र, गेल्या २-४ वर्षांपासून पाणी पातळी प्रचंड वाढली आहे. यामुळे १२ ते १५ मंदिरे बाधित झाली असून, ६ मंदिरे पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. प्रसिद्ध कमलजा माता मंदिरातील मूर्तीच्या नाकापर्यंत पाणी आले आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियुक्त समितीने एकदाही सरोवराची पाहणी केलेली नाही, ही दुर्दैवी बाब आहे.”

४१ लाखांचा निधी मंजूर, तरीही काम ठप्प
सरोवरातील वाढीव पाणी उपसा करण्यासाठी आणि गोमुख-गायमुखाचे पाणी वळवण्यासाठी ४१ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मात्र, वन्यजीव विभाग आणि पुरातत्व विभाग यांच्यात समन्वय नसल्याने कामाला सुरुवात झालेली नाही. “वन्यजीव विभाग दाद देत नाही आणि लोकप्रतिनिधींना जुमानत नाही,” अशा शब्दांत आ. सिद्धार्थ खरात (MLA Siddharth Kharat) यांनी संताप व्यक्त केला.