अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रुग्णालयात हलवले; कार्डियोलॉजी विभागातील डॉक्टरांकडून उपचार सुरू
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून, एंजिओग्राफीही करण्यात आली आहे.
एम्सकडून जेपी नड्डा यांच्या प्रकृतीबाबत हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आले आहे. या बुलेटिननुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्या आरोग्यावर डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
जेपी नड्डा यांच्यावर एम्समधील कार्डियोलॉजी विभागाच्या डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना विलंब न करता रुग्णालयात आणण्यात आले होते.
दरम्यान, एंजिओग्राफीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.