Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > देश

Gen Z Protests

Gen Zची ताकद! मोदी सरकारच्या १२ वर्षांत पहिल्यांदाच आंदोलनापुढे माघार; NEET गैरव्यवहार प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचे पद गेले

NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी देशभरात उठलेल्या तीव्र असंतोषाच्या लाटेनंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे.


gen zची ताकद मोदी सरकारच्या १२ वर्षांत पहिल्यांदाच आंदोलनापुढे माघार neet गैरव्यवहार प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचे पद गेले

Gen Z Protests |

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात आंदोलनामुळे पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याची गळती; सीपीजेच्या नेतृत्वाखालील जनआक्रोशापुढे केंद्र सरकार झुकले

NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी देशभरात उठलेल्या तीव्र असंतोषाच्या लाटेनंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत वजनदार आणि प्रभावशाली मंत्री मानल्या जाणाऱ्या प्रधान यांच्या या तडकाफडकी राजीनाम्याने देशाच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे. गेल्या १२ वर्षांच्या मोदी सरकारच्या कार्यकाळात विरोधकांना जे साध्य करता आले नव्हते, ते 'जेन झी' (Gen Z) तरुणाईच्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आंदोलनाने करून दाखवले आहे.

यापूर्वी शेतकरी आंदोलनासह अनेक मोठे राजकीय व सामाजिक लढे देशाने पाहिले. मात्र, त्या काळात सरकारने राजकीय डावपेच आणि ताकदीचा वापर करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते; एकाही केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला नव्हता. मात्र, यावेळेस 'सीपीजे' (CPJ) आणि युवा विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे प्रशासनावर इतका प्रचंड दबाव निर्माण झाला की, मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या सत्ताकाळात पहिल्यांदाच एखाद्या जनआंदोलनामुळे केंद्रीय मंत्र्याला पद सोडावे लागले आहे.

डिजिटल ताकद आणि आंदोलनाचा व्यापक प्रसार

'सीपीजे'च्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो 'जेन झी' विद्यार्थी या लढ्यात उतरले. हे आंदोलन केवळ राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरपुरते मर्यादित न राहता मुंबई, पुणे, कोलकाता यांसारख्या देशातील प्रमुख शहरांमध्ये वेगाने पसरले. या आंदोलनाचे सर्वात मोठे वेगळेपण म्हणजे विद्यार्थ्यांनी वापरलेली डिजिटल रणनीती. इन्स्टाग्राम, रील्स आणि मीम्सचा अत्यंत प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांनी आपली मागणी आणि असंतोष देशभरात पोहोचवला, ज्यामुळे सरकार पूर्णपणे बॅकफूटवर आले.

दिल्लीतील लाठीचार्स आणि आंदोलनाचा वळणबिंदू

२० जुलै रोजी दिल्लीत निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे परिस्थिती अधिक चिघळली. पोलीस कारवाईनंतर विद्यार्थ्यांमधील रोष आणखी ताणला गेला. या घडामोडींच्या दरम्यान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले आंदोलन मागे घेतले; परंतु सीपीजेचे अभिजित दीपके शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहिले. त्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे अखेर सरकारला नमते घ्यावे लागले.

धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा थेट पंतप्रधानांकडे सादर केला असून, त्या पत्राची प्रत स्वतः प्रसिद्धीमाध्यमांना जारी केली आहे. सीपीजेच्या या ऐतिहासिक विजयानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून मोठा जल्लोष साजरा केला.

Related to this topic: