Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > देश

पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी बेंगळुरूमध्ये सुरक्षा धास्ती; जेलटिनच्या कांड्या आढळल्या

पंतप्रधान ननरेंद्र मोदी यांच्या बेंगळुरू दौऱ्यापूर्वी रविवारी मोठी सुरक्षा धास्ती निर्माण झाली.


पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी बेंगळुरूमध्ये सुरक्षा धास्ती जेलटिनच्या कांड्या आढळल्या

Explosive Found |

नवी दिल्ली (Explosive Found) : पंतप्रधान ननरेंद्र मोदी यांच्या बेंगळुरू दौऱ्यापूर्वी रविवारी मोठी सुरक्षा धास्ती निर्माण झाली. मुख्य कार्यक्रम स्थळाजवळ दोन जेलटिनच्या कांड्या आढळल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

बेंगळुरू येथील सेंट्रल रेंजचे डीआयजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुरक्षा तपासणीदरम्यान या स्फोटक सामग्रीचा शोध लागला. पंतप्रधानांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार होता, त्या मुख्य स्थळापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर पादचारी मार्गाच्या कडेला या जेलटिन कांड्या आढळल्या.

“तपासणीदरम्यान पादचारी मार्गाच्या बाजूला दोन जेलटिन कांड्या आढळल्या. त्या मुख्य कार्यक्रम स्थळापासून सुमारे ३ किमी अंतरावर होत्या. पुढील तपास सुरू आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी संभाव्य दहशतवादी धोका लक्षात घेऊन दिल्ली मध्ये हाय अलर्ट जारी केला होता. त्यानंतर दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी संवेदनशील भागांमध्ये कडक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

“संशयास्पद हालचाली, बेवारस वस्तू आणि संवेदनशील भागात उभ्या असलेल्या वाहनांवर कडक लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत,” असे अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.

Related to this topic: