Breaking News
  • परभणीतील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळला, 30-40 जण दबल्याची माहिती
  • परळीत दिवसाढवळ्या अपहरण ऊसतोडणीच्या'उचल' पैशांवरून तरुणाला गाडीत टाकून पळवले
  • एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा
  • पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे
  • मान्सूनच्या विलंबामुळे मराठवाड्यात खरीप पेरण्या रखडल्या; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेला परिसरातील पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ आज पहाटे दोन मजली बिल्डिंगमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला.
  • सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे विहीरीत टेम्पो कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 40 चाळीस लाख रूपयांची मदत देण्यात आली.
  • डी.आर.डी.ओचे डॉ प्रदीप कुरुलकरवर आरोप निश्चित, खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा
  • छत्रपती संभाजी नगर येथील ATS पथकांच्या १५ टीम कडून विविध भागात धाडी

होम > देश

Domestic Worker Murder

१५ वर्षे घरकाम करणाऱ्या महिलेची हत्या; 'मला फाशी द्या'... डॉक्टरचे धक्कादायक उद्गार

नवी दिल्लीतील ग्रेटर कैलास परिसरातील 'माउंट कैलास' येथे घरकाम करणाऱ्या महिलेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले डॉ. मनीष गुप्ता यांना साकेत न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


१५ वर्षे घरकाम करणाऱ्या महिलेची हत्या मला फाशी द्या डॉक्टरचे धक्कादायक उद्गार

Domestic Worker Murder |

नवी दिल्ली (Domestic Worker Murder) : नवी दिल्लीतील ग्रेटर कैलास परिसरातील 'माउंट कैलास' येथे घरकाम करणाऱ्या महिलेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले डॉ. मनीष गुप्ता यांना साकेत न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुरावे गोळा करणे आणि घटनेमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडण्यासाठी आरोपीची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी न्यायालयाकडे कोठडीची मागणी केली होती.

या प्रकरणातील मृत महिला मीना या गेल्या १५ वर्षांपासून डॉ. गुप्ता यांच्या घरी घरकाम करत होत्या. प्राथमिक तपासानुसार, त्या घराच्या गच्चीवर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्या. घटनास्थळावरून रक्ताने माखलेली क्रिकेट बॅट आणि स्वयंपाकघरातील चाकू जप्त करण्यात आला असून, या वस्तूंचा हत्येसाठी वापर झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकराच्या सुमारास शेजारील इमारतीतील एका रहिवाशाने गच्चीवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा संबंधित महिला मृतावस्थेत आढळली.

अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा डॉ. मनीष गुप्ता हे मृतदेहाजवळील पायऱ्यांवर बसलेले होते. त्यांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न केला नव्हता. तसेच, पोलिसांना "मला फाशी द्या" असेही त्यांनी सांगितल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.

या प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त हेमंत तिवारी यांनी सांगितले की, हत्येसाठी वापर झाल्याचा संशय असलेली क्रिकेट बॅट आणि चाकू जप्त करण्यात आले असून तपास सुरू आहे. तसेच, आतापर्यंतच्या तपासात या हत्येत अन्य कोणत्याही व्यक्तीचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत.

दरम्यान, डॉ. गुप्ता हे गेल्या जवळपास दहा वर्षांपासून नैराश्य आणि 'ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर' (OCD) या आजारांवर उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरने चौकशीदरम्यान दावा केला की, मीना हलदार यांच्या येण्यामुळे घरात "नकारात्मक ऊर्जा" निर्माण होत होती आणि त्याचा त्यांच्या मुलाच्या अभ्यासावर वाईट परिणाम होत होता. डॉ. गुप्ता यांना मीना यांना कामावरून कमी करायचे होते, मात्र त्यांच्या पत्नीने त्याला विरोध केला होता. या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये बराच काळ मतभेद सुरू असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

घटना घडण्यापूर्वी परिसरातील रहिवासी आणि इतर घरकाम करणाऱ्या महिलांना इमारतीच्या गच्चीवरून मदतीसाठी आरडाओरडा आणि किंकाळ्या ऐकू आल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे काहीतरी गंभीर प्रकार घडत असल्याचा संशय स्थानिकांना आला होता.

या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, जवळच असलेल्या 'कैलाश हिल्स' भागात आयआरएस अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेला अवघे दोन महिने झाले असताना पुन्हा एकदा अशाच गंभीर गुन्ह्याने नागरिकांना हादरवून सोडले आहे.

Related to this topic: