Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > देश

Delhi visit

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात घडामोडींना वेग; देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

दिल्लीमध्ये 'कॉकरोच जनता पार्टी' आणि विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनामुळे अखेर राजकीय पटलावर मोठा फेरबदल झाला आहे.


धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात घडामोडींना वेग देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

विद्यार्थी आंदोलन आणि आगामी 'तिरंगा मार्च'च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले; अमृता फडणवीसांची प्रतिक्रियाही चर्चेत

दिल्लीमध्ये 'कॉकरोच जनता पार्टी' आणि विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनामुळे अखेर राजकीय पटलावर मोठा फेरबदल झाला आहे. आंदोलकांचा वाढता दबाव लक्षात घेता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. जंतर मंतर येथे २० जुलै रोजी आंदोलक विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर या आंदोलनाने उग्र रूप धारण केले होते. या घटनेनंतर देशभरातून विद्यार्थ्यांचा पाठिंबा वाढला आणि विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. सोनम वांगचूक यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले असले तरी आंदोलनाची तीव्रता कमी झाली नाही; उलटपक्षी त्याचे लोण इतर राज्यांमध्येही पसरले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला, ज्याला विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय मानला जात आहे.

या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. शनिवारच्या पहाटे पंढरपूर येथे आषाठी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पत्नीसह श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न केल्यानंतर फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाने अचानक दिल्लीत बोलावून घेतले. या तातडीच्या बोलावण्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, दिल्लीत पोहोचल्यानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर फडणवीस यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, 'नीट' (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ रविवारी मुंबईत ठाकरे बंधूंच्या वतीने 'तिरंगा मार्च'चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला मोठा जनसमुदाय जमण्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने फडणवीस यांची ही दिल्लीवारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील या घडामोडींनंतर सरकारला आगामी धोरणांमध्ये मोठे बदल करावे लागतील. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत कोणतेही ठोस भाकीत करणे कठीण आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळून ते दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार अशा चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत. यावर पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. "मला महाराष्ट्रातच राहायचे आहे आणि मी देवेंद्रजींनाही महाराष्ट्रातच ठेवणार आहे," असे वक्तव्य त्यांनी केले.

Related to this topic: