Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > देश

आसाम-अरुणाचल महापुर

राज्यात पुराचा हाहाकार; 6 जिल्ह्यांना पुराचा फटका, 22,000 हून अधिक लोक बेघर

Assam-Arunachal Flood: सततच्या मुसळधार पावसामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत


राज्यात पुराचा हाहाकार 6 जिल्ह्यांना पुराचा फटका 22000 हून अधिक लोक बेघर

Assam-Arunachal Flood |

दिसपूर (Assam-Arunachal Floods) : सततच्या मुसळधार पावसामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्याने घरे, रस्ते आणि शेतजमीन गिळंकृत केली आहे. दरम्यान, आसामच्या धेमाजी जिल्ह्यात 1965 मध्ये बांधलेल्या रेल्वे पुलाचा एक भागही कोसळल्याने रेल्वे सेवा स्थगित करावी लागली आहे. आतापर्यंत (Assam-Arunachal Flood) दोन्ही राज्यांमध्ये 22,000 हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, तर हवामान विभागाने येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

आसाममध्ये पावसामुळे हाहाकार, 6 जिल्ह्यांना पुराचा फटका

आसाम राज्य (Assam-Arunachal Flood) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) माहितीनुसार, धेमाजी, नलबाड़ी, दिब्रुगड, चिरांग, लखीमपूर आणि कोकराझार या जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका बसला आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, 22, 124 लोकांना पुराचा फटका बसला आहे. धेमाजी जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, एकट्या धेमाजी जिल्ह्यातील 15,483 लोकांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुराचे पाणी 96 गावांमध्ये शिरले असून, अंदाजे 1,690 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असून, त्यामुळे चिंता वाढली आहे.

ब्रह्मपुत्रा आणि उपनद्यांना पूर

सततच्या पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदी आणि तिच्या उपनद्यांची पाणी पातळी सतत वाढत आहे. (Assam-Arunachal Flood) नदीकिनारी असलेल्या गावांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. पुराचा फटका केवळ माणसांनाच बसलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या आपत्तीमुळे 48,000 हून अधिक जनावरांनाही फटका बसला आहे. अनेक पशुपालकांना आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावी लागली आहेत.

अरुणाचल प्रदेशात ढगफुटीमुळे हाहाकार, लेकू नदीला पूर

काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे शेजारील अरुणाचल प्रदेशातील परिस्थिती बिघडत चालली आहे. (Assam-Arunachal Flood) राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता आहेत आणि बचाव पथके त्यांचा शोध घेत आहेत. मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशातील लेकू नदीला पूर आला आहे. स्थानिकांच्या मते, त्यांनी इतिहासात पहिल्यांदाच नदीला इतके खवळलेले पाहिले आहे. नदीच्या पाण्याखाली आसामच्या जोनाई उपविभागातील केडीचुकसह अनेक गावे गेली आहेत. प्रशासनाने इशारा दिला आहे की, 28 जून ते 1 जुलै दरम्यान (Assam-Arunachal Flood) राज्यात मुसळधार पाऊस, वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट अपेक्षित असून, त्यामुळे धोका आणखी वाढू शकतो.