राष्ट्रीय महामार्ग अपघात

सेनगाव–रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

National Highway Accident: १ ऑगस्ट रोजी पानकनेरगाव येथे दोन तरुणांचा (सुजित बांगर व नितीन बांगर) राष्ट्रीय महामार्गावर होऊन मृत्यू झाला. अपघातमुळे शोकाची कळा गावात पसरली,

सेनगाव–रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

National Highway Accident

 

पानकनेरगाव येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू

सेनगाव (National Highway Accident) : पानकनेरगांव सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील दोन तरुणांचा दि. १ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.०० ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान सेनगाव–रिसोड राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे पानकनेरगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेनगाव–रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील पोद्दार शाळेजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव मोटारसायकल जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, मोटारसायकलस्वार सुजित कैलास बांगर (वय अंदाजे २६ वर्षे) व नितीन सुरेश बांगर (वय अंदाजे २५ वर्षे) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर कार्यवाहीसाठी सेनगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले. या (National Highway Accident) प्रकरणाचा पुढील तपास सेनगाव पोलीस करीत आहेत.

दरम्यान, सेनगाव–रिसोड राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरण झाल्यानंतर या मार्गावरील वाहनांचा वेग आणि वाहतुकीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भरधाव वाहनचालना, निष्काळजीपणा तसेच रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मार्गावर वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी, आवश्यक ठिकाणी इशारा फलक, रात्रीच्या वेळी परावर्तित (रिफ्लेक्टर) चिन्हे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सुजित कैलास बांगर आणि नितीन सुरेश बांगर यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पानकनेरगाव गावावर शोककळा पसरली आहे. दोघेही तरुण, होतकरू आणि सर्वपरिचित असल्याने त्यांच्या निधनाने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून परिसरातील नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २० वर्षीय IT इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २० वर्षीय IT इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

महंमदवाडीत भरधाव डंपरच्या धडकेत २० वर्षीय IT इंजिनिअर हमजा इब्राहिम सरकारचा मृत्यू झाला. एक तरुण गंभीर जखमी असून डंपर चालकाला अटक करण्यात आली.

Sep 23, 2026