पातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

रोहित पवारांनी केली राज्य शासनावर टीका, पातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पातूरमध्ये ६० वर्षीय व्यक्तीने दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केला. रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि राज्य शासनावर टीका केली.

रोहित पवारांनी केली राज्य शासनावर टीका, पातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पातूर : राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, अशा गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यात राज्य शासन अपयशी ठरत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) चे नेते रोहित पवार यांनी केली.

पातूर तालुक्यातील सावरगाव येथे दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६० वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर रोहित पवार यांनी गावाला भेट देत पीडित कुटुंबाची भेट घेतली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषीला कठोर शिक्षा झाल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

या प्रकरणातील आरोपीने पीडित मुलीला धमकावून घटना दडपण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून, या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटवले जातील, अशी ग्वाही रोहित पवार यांनी दिली.

यावेळी बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख, संग्राम गावंडे, डॉ. आशा मिरगे, हिदायत खान, रुमखान आदी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक; हिरानंदानीतील प्रकरणात कारवाई

मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक; हिरानंदानीतील प्रकरणात कारवाई

हिरानंदानीतील विकासकाच्या तक्रारीनंतर मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांनी अटक केली. फसवणूक आणि खंडणी प्रकरणात चौकशी सुरू.

Oct 02, 2026
पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

Patur burglary case: शहरातील सैदू प्लॉट-मुजावरपुरा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट व बेडरूमचे कुलूप तोडून रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना

Sep 28, 2026