परभणी युवक खून

परभणीत दारूच्या नशेत वाद; ३५ वर्षीय युवकाचा खून...?

Parbhani Youth Murder: धर्मापुरी येथील एका ३५ वर्षीय युवकाचा दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्रांनीच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशोक भगवान मोरे ३५ असे या मयत युवकाचे नाव

परभणीत दारूच्या नशेत वाद; ३५ वर्षीय युवकाचा खून...?

Parbhani Youth Murder

 

परभणीच्या धर्मापुरी येथील घटना; ग्रामिण पोलीसांनी दोन संशयीतांना घेतले ताब्यात...!

परभणी (Parbhani Youth Murder) : धर्मापुरी येथील एका ३५ वर्षीय युवकाचा दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्रांनीच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशोक भगवान मोरे ३५ असे या मयत युवकाचे नाव असून, कुंभकर्ण टाकळी शिवारातील गोरक्षण (गायरान जमीन) भागात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मंगळवार ९ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मयत अशोक मोरे आणि त्याचे साथीदार कुंभकर्ण टाकळी शिवारातील पोद्दार शाळेच्या मागे असलेल्या गट नंबर ४७२ मध्ये दारू पिण्यासाठी बसले होते.

दारू पिल्यानंतर त्यांच्यात काही कारणास्तव जोरदार वाद झाला. हा (Parbhani Youth Murder) वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही साथीदारांनी मिळून अशोक मोरे याला तेथील ओल्या लिंबाच्या काठीने व दगडाने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या गंभीर मारहाणीत अशोकचा जागीच मृत्यू झाला.या मारहाणीत अशोकचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे साथीदार घाबरले. त्यांनी रात्रभर त्याचा मृतदेह त्याच शाळेच्या मागील असलेल्या शेतामध्येच ठेवला. त्यानंतर बुधवार १० जून रोजी सकाळी ८:१५ वाजेच्या सुमारास गुन्हा लपवण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेह उचलला आणि कुंभकर्ण टाकळी येथील गोरक्षण (गायरान जमीन) भागात आणून टाकून दिला.मयताचा मृतदेह उताण्या अवस्थेत मोकळ्या जमिनीवर पडलेला आढळून आला. यावेळी घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामिण शिरतोडे व ग्रामिण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

तसेच धर्मापुरीचे सरपंच तानाजी कदम, टाकळीचे पोलीस पाटील दत्ता राऊत आणि धर्मापुरीचे पोलीस पाटील परमेश्वर कदम हे देखील उपस्थित होते. पोलिसांनी या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून, हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला होता.

घटनास्थळी पोलीस प्रशासनाची धाव 

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू आणि पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक मोहिते यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकारी फॉरेन्सिक टीम ही यावेळी घटनास्थळावर दाखल झाली होती. दरम्यान घटनास्थळावरून दोन संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टैग्स: Parbhani Youth Murder

संबंधित सामग्री

परभणीत हात उसने दिलेल्या पैशाच्या वादातून तरुणाचा खून 

परभणीत हात उसने दिलेल्या पैशाच्या वादातून तरुणाचा खून 

Parbhani Youth Murder: पालम येथे हात उसने दिलेल्या पैशांच्या वादातून लाकडी दांड्याने डोक्यात मारुन एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना पालम तालुक्यातील तांदुळवाडी येथे घडली.

May 21, 2026