परभणी तरुणाचा खून

परभणीत हात उसने दिलेल्या पैशाच्या वादातून तरुणाचा खून 

Parbhani Youth Murder: पालम येथे हात उसने दिलेल्या पैशांच्या वादातून लाकडी दांड्याने डोक्यात मारुन एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना पालम तालुक्यातील तांदुळवाडी येथे घडली.

परभणीत हात उसने दिलेल्या पैशाच्या वादातून तरुणाचा खून 

Parbhani Youth Murder

 

पालम तालुक्यातील तांदुळवाडी येथील घटना आरोपी ताब्यात 

परभणी (Parbhani Youth Murder) : पालम येथे हात उसने दिलेल्या पैशांच्या वादातून लाकडी दांड्याने डोक्यात मारुन एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना पालम तालुक्यातील तांदुळवाडी येथे घडली. सदर प्रकरणी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 

देवीदास रोहिदास जाधव यांनी तक्रार दिली आहे. हरिशचंद्र रोहिदास जाधव वय २८ वर्ष असे मयताचे नाव आहे.या घटने बाबत अधिक माहिती अशी की, हात उसण्या पैशांच्या वादातून आरोपी रामेश्वर नागनाथ जाधव व इतर एका अज्ञात व्यक्तीने लाकडी दांड्याने मारुन हरिशचंद्र यांचा खून केला. हात उसने दिलेले पैसे परत का देत नाही या कारणावरुन निर्माण झालेल्या वादातून हि घटना घडली. (Parbhani Youth Murder) पालम पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सपोनि मंजुषा मोरे करत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.समाधान पाटील, सपोनि आदित्य लोणीकर यांनी भेट दिली.

टैग्स: Parbhani Youth Murder

संबंधित सामग्री

परभणीत दारूच्या नशेत वाद; ३५ वर्षीय युवकाचा खून...?

परभणीत दारूच्या नशेत वाद; ३५ वर्षीय युवकाचा खून...?

Parbhani Youth Murder: धर्मापुरी येथील एका ३५ वर्षीय युवकाचा दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्रांनीच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशोक भगवान मोरे ३५ असे या मयत युवकाचे नाव

Jun 10, 2026