परभणी घरफोडी प्रकरण

परभणीत कुटुंब गेले साखरपुड्याला; चोरट्यांनी केला घर साफ ३.१३ लाखांचा ऐवज लंपास...!

Parbhani burglary case: परभणीतील साळापुरी येथे कुटुंब साखरपुड्याला गेल्यावर चोरट्यांनी घरफोडी करून ३.१३ लाखांचा ऐवज चोरला. दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

परभणीत कुटुंब गेले साखरपुड्याला; चोरट्यांनी केला घर साफ ३.१३ लाखांचा ऐवज लंपास...!

Parbhani burglary case

साळापुरी येथे मध्यरात्रीची घटना; चोरट्याविरुद्ध दैठणा पोलिसात गुन्हा दाखल....!

परभणी (Parbhani burglary case) : तालुक्यातील साळापुरी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण कुटुंब बाहेर गेले. हीच संधी साधून चोरट्याने घरफोडी केली. रोख रक्कम व चांदीचा ऐवज असा एकूण ३ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनिष रमाकांत घाटगे राहणार साळापुरी ता. जि.परभणी  हे आपल्या कुटुंबासह परभणी येथील पाथरी रोडवरील अन्नपूर्णा मंगल कार्यालय येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने २४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपासून ते २५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटाचे लॉक तोडून त्यामधील अंदाजे ३ लाख १० हजार रुपये रोख  व १२०० ग्रॅम चांदीचे दोन प्लेट व एक चांदीचा तांब्या, किंमत अंदाजे ३ हजार ६०० रुपये असा एकूण ३ लाख १३ हजार ६०० रुपयांचा ऐवज  चोरी करून आरोपी पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ट पोलीस अधिकारी व दैठणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाय यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी दैठणा पोलिसात गु.र.नं. १७३/२०२६ अन्वये भादंवि कलम ३३१(४), ३०५ नुसार शनिवार २५ एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा (Parbhani burglary case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परिसरात अलीकडे घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवून आरोपींचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

Kanhan illegal coal theft: अवैध कोळसा वाहतुकी विरोधात कन्हान पोलिसांनी धडक कारवाई करित कोळशाने भरलेला संशयित ट्रक जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिस रातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ

Oct 05, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026