परभणी जीवघेणा हल्ला

परभणीत तलवार-रॉडने दोघांवर जीवघेणा हल्ला

Parbhani fatal attack: परभणीतील अजिजीया नगरात एका व्यक्तीवर व त्याच्या मेव्हण्यावर तलवार, रॉड व काठ्यांनी हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

परभणीत तलवार-रॉडने दोघांवर जीवघेणा हल्ला

Parbhani fatal attack

परभणी शहरातील अजिजीया नगरातील घटना
सात जणांविरुध्द कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल

परभणी (Parbhani fatal attack) : शहरातील अजिजीया नगर परिसरात किरकोळ वादाच्या कारणावरून एका व्यक्तीवर व त्याच्या मेव्हण्यावर तलवार, लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना रविवार १० मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याप्रकरणी शेख रफीक पि. शेख मुसा  यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, फिर्यादी व त्यांचा मेहुणा हे आरोपींना ‘आमच्या मुलासोबत का वाद घालत आहात’ असा जाब विचारण्यासाठी अजिजीया नगरातील एका किराणा दुकानाजवळ गेले होते. त्यावेळी आरोपींनी संगनमत करून गैरकायदेशीर जमाव जमवला व तलवारसदृश धारदार शस्त्र, लोखंडी रॉड तसेच लाकडी काठ्यांच्या सहाय्याने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी शेख रफीक यांच्या डोक्यावर तलवार व लोखंडी रॉडने वार करण्यात आले. तसेच पाठीवर व पायावर लाकडी काठीने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले.

फिर्यादीच्या मेव्हण्याच्या डोक्यात व पाठीवरही लोखंडी रॉडने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. (Parbhani fatal attack) आरोपींनी दोघांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी शेख शफिक शेख कटुमिया, शेख दादामिया, शेख तालीम शेख दादामिया, अनवर शेख व इतर दोन ते तीन अनोळखी इसमांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी कासले हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026