गंगाखेड घरफोडी घटना

परभणीत भरदुपारी घरफोडी करणारा चोरटा सीसीटिव्हीत कैद

Gangakhed Burglary Case: परभणी शहरातील गंगाखेडमध्ये घरफोडीची घटना घडली. चोरट्याने ७४ हजाराचे सोन्याचे दागिणे लंपास केले आणि सीसीटिव्हीत कैद झाला.

परभणीत भरदुपारी घरफोडी करणारा चोरटा सीसीटिव्हीत कैद

Gangakhed Burglary Case

 

गंगाखेड शहरातील घटना जवळपास ७४ हजाराचा मुद्देमाल लंपास...!

परभणी/ गंगाखेड (Gangakhed Burglary Case) : शहरातील सारडा कॉलनी परिसरातील शिक्षकाचे कुटुंब नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्याचा फायदा घेत भर दुपारी घरफोडी करून सोन्याचे दागिणे लंपास करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. घटना शनिवार ९ मे रोजी घडली. या (Gangakhed Burglary Case) प्रकरणी रविवार १० मे रोजी रात्री उशिराने अज्ञात चोरट्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सोनपेठ तालुक्यातील पोहंडूळ तांडा जि.प. प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले संजीवकुमार व्यंकटराव गबाळे हे कुटुंबासह गंगाखेड शहरातील सारडा कॉलनी परिसरात राहतात. (Gangakhed Burglary Case) नातेवाईकांच्या घरी लग्न असल्याने शनिवार ९ मे रोजी सकाळी ८ वाजता गबाळे यांचे कुटुंब लग्न कार्यासाठी नांदेड येथे गेले होते. सायंकाळी ६ वाजता गंगाखेड येथे परत आले असता त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कुलूप कोंडा तुटलेला दिसला.

तेंव्हा त्यांनी घरात जाऊन पाहीले असता कपाटातील साहित्य व सोन्याचे दागिणे ठेवलेला प्लास्टिकचा डबा अस्तव्यस्त स्थितीत पडलेला दिसल्याने डबे उघडून पाहिले असता डब्ब्यात ठेवलेली ४ ग्राम वजनाची सोन्याची अंगठी, २ ग्राम वजनाचे मनी मंगळसूत्र, २ ग्राम वजनाची सोन्याची वेल व ३.५ ग्राम वजनाची सोन्याची अंगठी असे एकुण ११.५ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिणे (अंदाजे किंमत ७४ हजार २५३ रुपये) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे दिसले. या (Gangakhed Burglary Case) प्रकरणी संजीवकुमार व्यंकटराव गबाळे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रविवार १० मे रोजी रात्री उशिराने अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत. निखिल यादव-नितेश पवारांची चौकशी सुरू असून मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीचीही शक्यता.

Oct 03, 2026