पोलीस जमादार मृत्यू

परभणीत दुचाकी अपघातात पोलीस जमादाराचा संशयास्पद मृत्यू..?

Police officer Death: परभणीतील दुचाकी अपघातात पोलीस जमादार गंगाधर शिंदे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा अंदाज आहे.

परभणीत दुचाकी अपघातात पोलीस जमादाराचा संशयास्पद मृत्यू..?

Police officer Death

 

अज्ञात वाहनाची धडकाचा अंदाज; झरी -कोक परिसरातील घटना

परभणी (Police officer Death) : जिंतूर ते परभणी मार्गावर दुचाकीवरून प्रवास करत असताना पोलीस जमादाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना  रविवार  ३ मे रोजी पहाटे उघडकीस आली. झरी ते कोक दरम्यान माक पाटी जवळ ताई धाब्याच्या पुढे शेतात मृतावस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर राणा शिंदे (वय ४०, रा. त्रिमुर्ती नगर, परभणी) हे पोलीस मुख्यालयातील बँड पथकात जमादार म्हणून कार्यरत होते. शनिवार मध्यरात्री ते रविवारी पहाटे अंदाजे २.३० ते ३ वाजेच्या सुमारास ते जिंतूरहून परभणीकडे दुचाकी (क्र. एमएच २२ वाय ९८७८) वरून जात होते असा अंदाज आहे, ताई धाब्याजवळील माक पाटी परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी स्थानिक नागरिकांना शेतात मृतदेह (Police officer Death) आढळून आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी दिपककुमार वाघमारे, ग्रामीणचे पोनि राजगुरु, पोशि लोणसे, चावरे, डोंबे व इतर अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून जखमी अवस्थेतील अंमलदाराचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. दरम्यान वृत्त लिहि पर्यंत कुठलाहि गुन्हा दाखल नसल्याची माहिती पोलस सुत्रांनी दिली.  अंमलदारचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाल्याने ग्रामीण पोलिसांनी (Police officer Death) अपघात नेमका कसा घडला, याचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मयत गंगाधर शिंदे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात परभणी येथे संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026