नेताजीनगर गांजा जप्त

नेताजीनगर येथे 233 ग्रॅम गांजा जप्त; आरोपी फरार...

Netajinagar ganja seized: नेताजीनगर येथे गुप्त माहितीच्या आधारे 233 ग्रॅम गांजा जप्त केला गेला. आरोपी गोपाल सुशील मंडल याचा घराचा झडती करण्यात आला. आरोपी फरार झाल्यामुळे तपास सुरू आहे.

नेताजीनगर येथे 233 ग्रॅम गांजा जप्त; आरोपी फरार...

Netajinagar ganja seized

घोट (Netajinagar ganja seized) : येथून जवळच असलेल्या नेताजीनगर येथे घोट पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका घरातून 233 ग्रॅम गांजा जप्त केला.ही कारवाई काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी गोपाल सुशील मंडल (वय 52 वर्षे,रा.नेताजीनगर) याच्या राहत्या घराची त्याच्या पत्नीसमोर झडती घेण्यात आली. यावेळी घरामध्ये 233 ग्रॅम गांजा आढळून आला. (Netajinagar ganja seized) जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 11 हजार 650 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांची धाड पडण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. (Netajinagar ganja seized) घोट पोलिसांनी आरोपीविरुद्ध अप. क्र. 281/2026 अन्वये कलम 8(क), 20(ब)(II)(अ), एन.डी.पी.एस.अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास घोट पोलीस मदत केन्द्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश बरडे करीत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

संबंधित सामग्री

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

लोहगडच्या दरीत नेऊन केतनचा मृत्यू; आरोपींनी घटनास्थळासह लोणावळ्यातील दरीतील मृत्यूंची माहिती शोधल्याचा पोलिसांचा दावा

Sep 23, 2026
भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

भद्रावती शहर हादरले! भर चौकात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

भद्रावतीत भर चौकात ४० वर्षीय उमदेव मेश्राम यांची धारदार शस्त्राने हत्या. अज्ञात आरोपींचा शोध सुरू; पोलिसांकडून तपासाला वेग.

Sep 23, 2026