नानलपेठपत्नी छळ

पैसे व इतर वस्तुंची मागणी करत विवाहितेचा छळ

wife Harassment case: लग्नानंतर पैसे व इतर वस्तुंची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती, सासरे, दोन नणंद व दोन नंदव्या अशा सहा जणांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पैसे व इतर वस्तुंची मागणी करत विवाहितेचा छळ

wife Harassment case

 

सासरच्या मंडळीवर नानलपेठ पोलीसात गुन्हा दाखल

परभणी (wife Harassment case) : लग्नानंतर पैसे व इतर वस्तुंची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती, सासरे, दोन नणंद व दोन नंदव्या अशा सहा जणांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी ऋतुजा बिर्‍हाडे यांचा विवाह   २०२४ मध्ये पनवेल येथील ऋषीकेश बिर्‍हाडे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर  फिर्यादी सासरी नांदण्यासाठी गेल्यानंतर आरोपी पती ऋषीकेश बिर्‍हाडे, सासरे भाऊसाहेब   बिर्‍हाडे, मोठी नणंद मिताली  होवाळ, धाकटी नणंद अंकिता मरवडे तसेच नंदई विशाल होवाळ व रघूनाथ मरवडे यांनी माहेराहून पैसे, फॉर्च्युनर कार, सोने आणण्याची मागणी  केली.

मागणी पूर्ण न केल्याने फिर्यादीला क्षुल्लक कारणांवरून  सतत अपमानित करत मारहाण करण्यात आली. या (wife Harassment case) प्रकरणी फिर्यादी ऋतुजा ऋषीकेश बिर्‍हाडे  यांच्या फिर्यादीवरून शनिवार ४ जुलै रोजी पती ऋषीकेश भाऊसाहेब बिर्‍हाडे, सासरे भाऊसाहेब राजाराम बिर्‍हाडे, मिताली विशाल होवाळ, अंकिता रघूनाथ मरवडे, विशाल संपत होवाळ आणि रघूनाथ मारोती मरवडे यांच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

तुझे आंघोळ करतानाचे फोटो आहे, म्हणत महिलेचा छळ

तुझे आंघोळ करतानाचे फोटो आहे, म्हणत महिलेचा छळ

Married Women Harassment: २१ वर्षाच्या विवाहित महिला तुझा आंघोळ करताना उघडे फोटो माझ्या मोबाईलसोबत धमकी देत निघाल्याच्या आरोपावर पळून गेल्याबद्दल पोलिसांनी आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

Aug 04, 2026
परभणीत त्या विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा...!

परभणीत त्या विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा...!

Matrimonial suicide case: लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर विवाहितेला हुंड्यासाठी त्रास दिला . याच त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पोखर्णी येथे घडली

Jul 07, 2026
अकोला हादरलं! गजानन नगरात विवाहितेची आत्महत्या;

अकोला हादरलं! गजानन नगरात विवाहितेची आत्महत्या;

अकोला शहरातील गजानन नगरमध्ये विवाहितेने आत्महत्या केली. हुंड्यासाठी छळाचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर केला आहे.

Apr 12, 2026