विवाहित महिला छळ

तुझे आंघोळ करतानाचे फोटो आहे, म्हणत महिलेचा छळ

Married Women Harassment: २१ वर्षाच्या विवाहित महिला तुझा आंघोळ करताना उघडे फोटो माझ्या मोबाईलसोबत धमकी देत निघाल्याच्या आरोपावर पळून गेल्याबद्दल पोलिसांनी आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

तुझे आंघोळ करतानाचे फोटो आहे, म्हणत महिलेचा छळ

Married Women Harassment

 

विवाहितेने आरडाओरडा केल्याने आरोपीचे पलायन

आखाडा बाळापूर (Married Women Harassment) :  येथील पोलिस स्थानक हद्दीतील एका गावातील विवाहित महिलेला तुझे आंघोळ करताना उघडे फोटो माझ्या मोबाईल मध्ये आहे तु माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव म्हणून झटापट सुरू केली यामुळे घाबरून विवाहितेने आरडाओरडा केला यामुळे आरोपी घटनास्थळावरून पळून गेला याबाबत सदर आरोपी विरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे असं सांगण्यात आलं.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार २७ जुलै रोजी दुपारी बाळापूर पोलिस स्थानक हद्दीतील एका गावात २१ वर्षीय विवाहिताघरी एकटी असल्याचे पाहुन तुझे अंघोळ करतानाचे उघडे फोटो माझे मोबाईल मध्ये आहेत तु माझे सोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर मी तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी देवुन वाईट उद्देशाने महिलेचा उजवा हात धरुन तिच्या सोबत झटापट करीत असताना घाबरून महिलेने जोरात ओरडल्याने आजुबाजुचे शेजारी येतील या भितीने आरोपी घरातुन निघुन जात असताना तु जर याबद्दल कोणाला काही सांगितले तर तुझे पतीला जीवे मारुन टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली म्हणुन गुन्हा.याबाबत २ऑगस्ट रोजी उशिरा आरोपी विरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. (Married Women Harassment) घटनास्थळी पोलिस निरीक्षक शरद मरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, बिट प्रमुख सुनील रिठे यांनी भेट दिली.

आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता पोलिस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, बिट प्रमुख सुनील रिठे, पिराजी बेले यांनी आरोपी माग काढून आज त्यास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले आहे असं पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर यांनी सायंकाळी सांगितले.

संबंधित सामग्री

नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होऊन 38 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Sep 05, 2026
बीडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेट्रोल ओतून पेटवल्याचा आरोप; उपचारादरम्यान अनुष्का शिरसाट यांचा मृत्यू

बीडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेट्रोल ओतून पेटवल्याचा आरोप; उपचारादरम्यान अनुष्का शिरसाट यांचा मृत्यू

बीडच्या पिंपळनेर परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Aug 13, 2026
पॉश कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील ६७२ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस

पॉश कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील ६७२ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस

POSH Act Implementation: कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम, २०१३ (पॉश अॅक्ट) मधील तरतुदी तसेच मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशांची अंमलबजावणी..

Aug 07, 2026
टीव्ही अभिनेत्री अदिती शर्माची पतीसह सासरच्या तिघांविरोधात तक्रार; कौटुंबिक हिंसाचारासह मानसिक छळाचे गंभीर आरोप

टीव्ही अभिनेत्री अदिती शर्माची पतीसह सासरच्या तिघांविरोधात तक्रार; कौटुंबिक हिंसाचारासह मानसिक छळाचे गंभीर आरोप

टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अदिती शर्मा (वय २९) यांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर आरोप करत मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Aug 02, 2026
महिलांच्या सुरक्षेसाठी 'दामिनी पथक' तातडीने कार्यान्वित करा

महिलांच्या सुरक्षेसाठी 'दामिनी पथक' तातडीने कार्यान्वित करा

Malkapur Damini Pathak: काही दिवसांपासून महिला व मुलींची छेडछाड, पाठलाग, अश्लील हावभाव, वाईट नजरेने पाहणे, प्रयत्न अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण

Jul 27, 2026