Beed Crime News

बीडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेट्रोल ओतून पेटवल्याचा आरोप; उपचारादरम्यान अनुष्का शिरसाट यांचा मृत्यू

बीडच्या पिंपळनेर परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

बीडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेट्रोल ओतून पेटवल्याचा आरोप; उपचारादरम्यान अनुष्का शिरसाट यांचा मृत्यू

मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात पतीच्या छळाची माहिती; ‘त्याला जन्मठेप द्या’ अशी अनुष्का यांची मागणी, आरोपी मिलिंद शिरसाटला बीडमधून अटक

बीडच्या पिंपळनेर परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेत अनुष्का शिरसाट या गंभीररीत्या भाजल्या होत्या. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी पती मिलिंद शिरसाट याला पोलिसांनी बीडमधून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळनेर येथे अनुष्का आणि मिलिंद शिरसाट यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होत होते. मिलिंद हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याच संशयातून दोघांमध्ये वाद वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

मुलाच्या उपस्थितीत घडला प्रकार

7 ऑगस्ट रोजी झालेल्या वादानंतर मिलिंद शिरसाटने अनुष्का यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिल्याचा आरोप आहे. त्यावेळी त्यांचा मुलगाही घटनास्थळी उपस्थित होता. आईला वाचवण्यासाठी त्याने वडिलांकडे विनवणी केली. मात्र, त्यानंतरही अनुष्का यांना आग लावण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.

या घटनेत अनुष्का गंभीररीत्या भाजल्या. सुरुवातीला त्यांच्यावर उपचार करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यूपूर्वी पतीच्या छळाची माहिती

8 ऑगस्ट रोजी पोलिसांनी अनुष्का शिरसाट यांचा जबाब नोंदवला होता. या जबाबात त्यांनी पतीकडून आपल्यासह मुलाला मारहाण केली जात असल्याची माहिती दिली. 7 ऑगस्टच्या घटनेवेळी मुलगा ‘पप्पा, मम्मीला मारू नका’ असे म्हणत रडत विनवणी करत होता, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले.

पतीने आपल्याला पेटवून दिल्याचे सांगताना अनुष्का यांनी पोलिसांकडे आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. ‘साहेब, त्याला जन्मठेप द्या,’ अशी विनंती त्यांनी मृत्यूपूर्वी केली होती. त्यांच्या या जबाबामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

अनुष्का अंगणवाडी कार्यकर्त्या; पतीवर आर्थिक छळाचाही आरोप

अनुष्का शिरसाट या अंगणवाडी कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या. त्यांना मिळणारा पगारही पती स्वतःच्या बँक खात्यावर घेत असल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक कलह, चारित्र्यावर घेतला जाणारा संशय आणि पतीकडून होणारा कथित छळ या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेनंतर मिलिंद शिरसाट घटनास्थळावरून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्याला बीडमधून ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम आणि इतर बाबींचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित सामग्री

नाकाबंदीत पोलिसाला कारने २०० मीटर फरफटले! कॉन्स्टेबल दिलीप भोई गंभीर जखमी; थरारक CCTV व्हिडीओ समोर

नाकाबंदीत पोलिसाला कारने २०० मीटर फरफटले! कॉन्स्टेबल दिलीप भोई गंभीर जखमी; थरारक CCTV व्हिडीओ समोर

कळंबोलीत नाकाबंदीदरम्यान पोलिस कॉन्स्टेबलला कारने २०० मीटर फरफटले. दिलीप भोई गंभीर जखमी; बनावट नंबर प्लेट असलेल्या कारमधील आरोपींचा शोध सुरू.

Nov 11, 2026
पुण्यात गाडीला कट मारल्याचा वाद जीवावर बेतला! शिवमवर कोयत्याने हल्ला, शरीरावर ७०० टाके

पुण्यात गाडीला कट मारल्याचा वाद जीवावर बेतला! शिवमवर कोयत्याने हल्ला, शरीरावर ७०० टाके

राजगुरुनगरमध्ये गाडीला कट मारल्याच्या वादातून तीन अल्पवयीन मुलांचा शिवम करमारेवर कोयत्याने हल्ला. तीन बोटे तुटली, शरीरावर ७०० टाके.

Nov 11, 2026
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर बँक निवडणुकीदरम्यान कमलाकर शिंदे बेपत्ता; मुलगी सृष्टी यांचा अरविंद पाटलांवर अपहरणाचा गंभीर आरोप.

Nov 09, 2026
 पबमध्ये शर्ट काढून फिरवला अन् वाद पेटला! तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला, महिलेसह चौघांना अटक

पबमध्ये शर्ट काढून फिरवला अन् वाद पेटला! तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला, महिलेसह चौघांना अटक

पुण्यातील विमाननगरमध्ये पबमधील वादातून तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक.<br/>

Nov 09, 2026
लातूरमध्ये प्रॉपर्टीसाठी बापानेच संपवलं पोटच्या मुलाचं आयुष्य

लातूरमध्ये प्रॉपर्टीसाठी बापानेच संपवलं पोटच्या मुलाचं आयुष्य

लातूरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून सात वर्षीय अरमानची हत्या केल्याचा आरोप. याप्रकरणी ५८ वर्षीय वडिलांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

Nov 09, 2026