मानोरा (Caste abuse case) : तालुक्यातील एका गावातील मुलीचा मोबाईल फोडला, मोबाईल का फोडला असे विचारले असता लाथा बुक्क्याने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी अक्षय धनराज जाधव व संजय धनराज जाधव यांच्याविरुद्ध मुलीच्या वडिलाने ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून (Caste abuse case) पोलिसांनी ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार मागील ३ महिन्यापासून काही संबंध नसताना गावातील अक्षय जाधव याने माझ्या मुलीला मानोरा येथील कॉलेजच्या रस्त्यावर दि. १३ एप्रिल रोजी भेटून तिला धक्का मारून तिच्याजवळील मोबाईल फोन घेऊन तो फोडून आणून दिला.
१५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान गावातील बौद्ध विहारजवळ अक्षय जाधव हा दिसला. मी त्याला मुलीचा मोबाईल का फोडला असे हटकले असता मी तुमच्या मुलीला किडनप करून टाकतो. तसेच तिचा पत्ताही लागू देणार नाही, अशी धमकी दिली. व लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू करून त्याच्या हातातील काठीने डोक्यावर मारून जखमी केले. तसेच संजय जाधव हा हातात काठी घेऊन धावत आला. अन त्याच्या भावास मारून टाक पाहून घेऊ असे सांगत जातीवाचक शिवीगाळ केली. (Caste abuse case) मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये वरील २ आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी हे करीत आहेत.
मुलीचा मोबाईल फोडला, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल
Caste abuse case: मानोरात मुलीचा मोबाईल फोडल्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. या घटनेत आरोपींनी पीडितेचे वडिलांना मारहाण केली.
Caste abuse case
संबंधित सामग्री
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी
नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!
मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू
ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम
आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.
दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर!
Manora Drought declared: गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात असताना शासनाने काढलेला दुष्काळी शासन निर्णय 'कोरड्या दुष्काळाचा कोरडा जीआर' आहे. दुष्काळी उपाययोजना