गोंदिया ड्रग्ज जप्ती

४.३३ लाखांचे एम.डी.ड्रग्ज जप्त; आरोपी अटकेत

Gondia drugs seized: गोंदिया पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक पावले उचलली. संजयनगर परिसरात १९.७ ग्रॅम एम.डी. क्रिस्टल पावडर जप्त केले आहे. आरोपी असलान खान याला अटक करण्यात आली.

४.३३ लाखांचे एम.डी.ड्रग्ज जप्त; आरोपी अटकेत

Gondia drugs seized

 

शहर पोलिसांची मोठी कारवाई

गोंदिया (Gondia drugs seized) : शहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. या अनुसंगाने मागील आठवडाभरापासून सतत कारवाई केली जात आहे. यानुरूप  संजयनगर परिसरात छापा टाकून ४ लाख ३३ हजार ४०० रुपये किंमतीचे १९.७ ग्रॅम मेथॉडान (एम.डी.) क्रिस्टल पावडर जप्त केले आहे. या प्रकरणी असलान ऊर्फ बाबु इकबाल खान (२१) रा.शास्त्री वार्ड, संजयनगर याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून मोबाईलसह एकूण ४ लाख ४३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर असे की,  गोंदिया शहर पोलीस पथक २ मे रोजी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंगवर करीत होते. (Gondia drugs seized) दरम्यान संजयनगर येथील असलान खान हा आपल्या राहत्या घरी एम.डी. पावडर बाळगून त्याची विक्री करत आहे.  अशी माहिती गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या आदेशानुसार पोलिसांनी दोन शासकीय पंच, फोटोग्राफर आणि वजनकाटा सोबत घेऊन आरोपीच्या घरावर छापा टाकला. घरझडती घेतली असता बेडरुममधील कोपर्‍यात असलेल्या लोखंडी पेटीत एका कापडी पिशवीत स्टीलच्या डब्यात लपवलेला पारदर्शक पॉलिथीनमधील मळकट रंगाचा पावडर मिळून आला. पंचांसमोर विचारणा केली असता आरोपीने तो पावडर मेथॉडान एम. डी. क्रिस्टल असल्याचे सांगितले. पोलिसांनी २२ हजार रुपये प्रति ग्रॅम दराने १९.७ ग्रॅम पावडर आणि १० हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला आहे.

या (Gondia drugs seized) प्रकरणी आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि वैभव गेडाम  करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर पर्वते, सपोनि वैभव गेडाम, पोउपनि अनिल डोंगरवार, सफौ कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, दिपक रहांगडाले, निशिकांत लोंदासे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, कुणाल बारेवार, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे, विजय बिसेन यांनी केली.

संबंधित सामग्री

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करीचा मोठा पर्दाफाश; 526 किलो अमली पदार्थांसह 5 पाकिस्तानी नागरिक ताब्यात

अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करीचा मोठा पर्दाफाश; 526 किलो अमली पदार्थांसह 5 पाकिस्तानी नागरिक ताब्यात

अरबी समुद्रात मोठी कारवाई! 526 किलो ड्रग्ज जप्त, 5 पाकिस्तानी नागरिक अटकेत; आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये.

Oct 02, 2026
परभणीत मोटार वायर चोरणारे सहा चोरटे ताब्यात

परभणीत मोटार वायर चोरणारे सहा चोरटे ताब्यात

Daithana Police Action: डफवाडी शिवारातील शेतातून मोटारचे वायर चोरी गेल्याच्या प्रकरणात दैठणा पोलिसांनी तपास करत चोरट्यांना ताब्यात घेतले. वायर वितळवून मिळविलेले दोन किलो तांबे..

Sep 29, 2026
गोंदियात ९ व्या राज्यस्तरीय फ्लोअरबॉल चॅम्पियनशिपचा दिमाखदार समारोप

गोंदियात ९ व्या राज्यस्तरीय फ्लोअरबॉल चॅम्पियनशिपचा दिमाखदार समारोप

Gondia Floorball Championship: गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुलात  फ्लोअरबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ गोंदिया आणि फ्लोअरबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन

Sep 24, 2026