मंगरूळपीर सत्तूर हल्ला

मंगरूळपीर येथे  सत्तूराने हल्ला; दोघे गंभीर जखमी

Mangrulpir-Sattur Attack: मंगरूळपीर शहरात बसस्टॉपसमोरील विराट पान सेंटरवर होणाऱ्या एका झगामुळे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांना हल्ल्यादरम्यान दगड आणि लाठीच्या मारामुळे जखमा

मंगरूळपीर येथे  सत्तूराने हल्ला; दोघे गंभीर जखमी

Mangrulpir-Sattur Attack


पाच आरोपींसह दोन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा, तिघांना अटक

मंगरूळपीर (Mangrulpir-Sattur Attack) : मंगरूळपीर शहरातील बसस्टॉपसमोरील विराट पान सेंटर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर होऊन सत्तूर व दगडाने करण्यात आलेल्या हल्ल्यात दोन भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना ९ जुलै रोजी  घडली. या प्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी   पाच नामनिर्देशित आरोपी व दोन अनोळखी महिलांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले, असून तिघा आरोपींना दि.11 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल नागोराव सिनगारे (वय ३०, रा. वरुड बु., ता. मंगरूळपीर) हे आपला भाऊ अंकुश सिनगारे यांच्यासह विराट पान सेंटरवर उभे असताना आरोपींनी अंकुश यांना खाली पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी विशाल यांनी जाब विचारताच आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने हातातील सत्तूरने विशाल व अंकुश या दोघांवर सपासप वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.

जखमींना प्रथम ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर (Mangrulpir-Sattur Attack) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान नातेवाईक अजय काळू सिनगारे यांनी घटनास्थळाचा व्हिडिओ दाखविल्यानंतर आरोपींची ओळख पटली. त्यानुसार उमेश रमेश इंगोले, मंगेश रमेश इंगोले, दिनेश उर्फ डेब्या रमेश इंगोले, रमेश इंगोले तसेच दोन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी गुन्हा क्र. ४९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी  तिघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोळंके  करीत आहे.

संबंधित सामग्री

दरोडेखोरांशी झुंज देताना जीव गमावलेल्या रायसिंग सोळंके यांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत द्या

दरोडेखोरांशी झुंज देताना जीव गमावलेल्या रायसिंग सोळंके यांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत द्या

Raising Solanke: मलकापूर तालुक्यातील काटी येथे दरोडेखोरांशी झुंज देताना जीव गमावलेल्या रायसिंग सिताराम सोळंके यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने १० लाख रुपयांचा सहाय्यता निधी द्यावा, अशी मागणी

Aug 14, 2026
आतंकवादी फिरत असल्याचे सांगून सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला

आतंकवादी फिरत असल्याचे सांगून सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला

Hingoli Rural Police: समोर आतंकवादी फिरत  असल्याचे  सांगून त्यांच्या  जवळील सोन्याची अंगठी  काढण्यास सांगून रुमालामध्ये ठेवल्याचे भासून सोळंके यांच्या गाडीच्या डिक्कित ठेवून निघून गेले.

Aug 04, 2026
काचा फोडल्याचा जाब विचारल्याने महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

काचा फोडल्याचा जाब विचारल्याने महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

women Molestation Case: हिंगोली या शहराजवळील ग्रामपंचायत हद्दिमध्ये एका महिलेच्या घरावर दगड फेकून मारण्यात आले. काचाच्या बुरशीतून गर्दी निकालून त्यानंतर आरोपीवर धमकी

Jul 16, 2026
रिसोड शहरातील हिंगोलीच्या मार्गावर जुन्या वादाच्या कारणावरून खून

रिसोड शहरातील हिंगोलीच्या मार्गावर जुन्या वादाच्या कारणावरून खून

Risod murder Case: १५ जून रोजी रिसोड शहरातील हिंगोलीच्या मार्गावर भगवान सुभाष गायकवाड हा मृतक असून त्याला डोक्यावर जबरदस्ती करून हत्या करण्यात आली.

Jun 16, 2026
चहाच्या टपरीवरील किरकोळ वादातून भीषण हाणामारी; दोन तरुणांचा मृत्यू

चहाच्या टपरीवरील किरकोळ वादातून भीषण हाणामारी; दोन तरुणांचा मृत्यू

Surat Violent Clash: सुरतच्या सिंगणपूर भागातील एका चहाच्या टपरीवर झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर एका हिंसक संघर्षात झाले, ज्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून

Jun 08, 2026