महिला विनयभंग प्रकरण

काचा फोडल्याचा जाब विचारल्याने महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

women Molestation Case: हिंगोली या शहराजवळील ग्रामपंचायत हद्दिमध्ये एका महिलेच्या घरावर दगड फेकून मारण्यात आले. काचाच्या बुरशीतून गर्दी निकालून त्यानंतर आरोपीवर धमकी

काचा फोडल्याचा जाब विचारल्याने महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

women Molestation Case

हिंगोली (women Molestation Case) : शहराजवळील बळसोंड ग्रामपंचायत हद्दिमध्ये एका महिलेच्या घरावर दगड फेकून मारल्याने खिडकीच्या काचा फुटल्या असता महिलेने याबाबतचा जाब विचारल्याने महिलेचा विनयभंग केल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात गुरूवारी रात्रीच्या सुमारास एका आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहराजवळील ग्रामपंचायत हद्दिमधील एका भागात सुनिल विष्णु काळे याने एका महिलेच्या घरावर दगड फेकून मारल्याने घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या होत्या. त्यामुळे महिलेच्या पित्याने सुनिल काळे यांना १६ जुलै रोजी जाब विचारला असता त्यांच्या घरामध्ये आरोपीने जाऊन महिलेचा विनयभंग केला. याचवेळी महिलेच्या पित्याने काळे यांच्या तावडीतून तिला सोडविले. याचवेळी काळे याने तु जर माझ्या विरूध्द पोलिसात तक्रार केली तर तुम्हाला खतम करून टाकतो, अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात सायंकाळच्या सुमारास महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सुनिल विष्णू काळे याच्या विरूध्द विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खोडवे हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होऊन 38 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Sep 05, 2026
दरोडेखोरांशी झुंज देताना जीव गमावलेल्या रायसिंग सोळंके यांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत द्या

दरोडेखोरांशी झुंज देताना जीव गमावलेल्या रायसिंग सोळंके यांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत द्या

Raising Solanke: मलकापूर तालुक्यातील काटी येथे दरोडेखोरांशी झुंज देताना जीव गमावलेल्या रायसिंग सिताराम सोळंके यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने १० लाख रुपयांचा सहाय्यता निधी द्यावा, अशी मागणी

Aug 14, 2026
बीडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेट्रोल ओतून पेटवल्याचा आरोप; उपचारादरम्यान अनुष्का शिरसाट यांचा मृत्यू

बीडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेट्रोल ओतून पेटवल्याचा आरोप; उपचारादरम्यान अनुष्का शिरसाट यांचा मृत्यू

बीडच्या पिंपळनेर परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Aug 13, 2026
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर नांदेडात हल्ला

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर नांदेडात हल्ला

Sukhbir Singh Badal: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल हे नांदेड दौर्‍यावर आले असता त्यांच्यावर गुरुवारी दुपारी १.५० च्या सुमारास खंजरने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर

Aug 13, 2026
ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; गाडीवर चिखल, चप्पल, बूट फेकले

ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; गाडीवर चिखल, चप्पल, बूट फेकले

Mamata Banerjee: ममता बॅनर्जी याच्या ताफ्याला घेरले. या वेळी आंदोलकांनी 'चोर-चोर'च्या घोषणा देत त्यांच्या गाडीवर चिखल फेकल्याचा आरोप आहे.ही घटना बीजपूर येथे घडली.

Aug 09, 2026