रवि जैस्वाल, अंकुश वानकर, नारायण दुधमल यांच्यावर चुडावा पोलिसात गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Liquor Smuggling) : पुर्णेच्या दारु दुकानातून होत असलेली देशी दारुची तस्करी स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील अंमलदारांनी पकडली आहे. १३ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास कावलगाव पिंपरण रोडवरील खडकी कावलगाव येथे सदर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रवि जैस्वाल, अंकुश वानकर, नारायण दुधमल या तिघांवर चुडावा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थागुशाचे पोनि. गजेंद्र सरोदे, पोउपनि. चंदनसिंह परिहार, रवि जाधव, रंगनाथ दुधाटे, दिपक मुदीराज, हनुमान ढगे, धोत्रे, इमरान, गजानन क्षिरसागर, विशेष पथकातील पोउपनि. अर्जून टरके, गोविंद चुडावकर, यशवंत वाघमारे यांचे पथकाने कावलगाव पाटी जवळ कावलगावच्या दिशेने येणारा पिकअप थांबविला. चालकाला त्याचे नाव विचारले असता संबंधिताने आपले नाव नारायण पांडूरंग दुधमल, असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १ लाख १५ हजार २०० रुपये किंमतीची देशी दारु, २८ हजार रुपये किंमतीची भिंगरी संत्रा दारु मिळून आली. वाहनासह एकूण ३ लाख ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची दारु कुठून आणली व कोठे टाकत आहे, अशी विचारणा केली असता संबंधिताने द खुशी इंटरप्रायजेस नांदेड यांच्याकडून माल आणला असून रवि जैस्वाल यांच्या सांगण्यावरुन अंकुश वानकर यांच्याकडे दारु टाकत असल्याची माहिती दिली. या (Parbhani Liquor Smuggling) प्रकरणी पोलीस अंमलदार गजानन क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरुन रवि जैस्वाल, अंकुश वानकर, नारायण दुधमल या तिघांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.