परभणीत स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून एलसीबीची धडक कारवाई

 पालम तालुक्यात अवैध दारू व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत असताना स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत पेठ पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा जप्त केला.

परभणीत स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून एलसीबीची धडक कारवाई

Illegal Liquor Seizure

पालम तालुक्यातून १.३४ लाखांची विदेशी दारू जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी (Illegal Liquor Seizure) : पालम तालुक्यात अवैध दारू व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत असताना स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत पेठ पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा जप्त केला. विशेष म्हणजे ही कारवाई स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून करण्यात आल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला १७ मे रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पेठ पिंपळगाव येथील सुरेश सदाशिव मोडके यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान “गोवा फॉर सेल” अशी विदेशी दारूचे तब्बल ८० बॉक्स जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत १ लाख ३४ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३१/२०२६ नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (ई) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस हवालदार राहुल ईश्वरराव परसोडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंदन परिहार, हेडकॉन्स्टेबल राहुल परसोडे, पोलीस हवालदार महेश कवठाळे, माणिक वाघ तसेच पोलीस शिपाई दिलीप निलपत्रेवार आणि शरद सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

संबंधित सामग्री

परभणीत जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

परभणीत जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

शहरातील हडको कॉर्नर परिसरात वॉटर प्लांटमध्ये सुरू असलेल्या जुगाराच्या डावावर नवा मोंढा पोलिसांनी छापा टाकून २ लाख ५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Aug 28, 2026
परभणीत पुर्णेच्या दारु दुकानातून होणारी तस्करी पोलिसांनी पकडली...!

परभणीत पुर्णेच्या दारु दुकानातून होणारी तस्करी पोलिसांनी पकडली...!

Parbhani Liquor Smuggling: पुर्णेच्या दारु दुकानातून होत असलेली देशी दारुची तस्करी स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील अंमलदारांनी पकडली आहे.

Aug 14, 2026
तरुणीच्या विनयभंगप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

तरुणीच्या विनयभंगप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

शहरातील एका १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Jun 12, 2026
परभणीत लग्नाचे आमिष दाखवून २७ वर्षीय विवाहितेवर अत्याचाराचा आरोप; चार वेळा गर्भपात घडवल्याची तक्रार

परभणीत लग्नाचे आमिष दाखवून २७ वर्षीय विवाहितेवर अत्याचाराचा आरोप; चार वेळा गर्भपात घडवल्याची तक्रार

गंगाखेड शहरात पतीपासून विभक्त राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Jun 06, 2026
परभणीत ऑटो व कारचा भीषण अपघात; ५ जण जखमी, तिघांना परभणीत हलविले

परभणीत ऑटो व कारचा भीषण अपघात; ५ जण जखमी, तिघांना परभणीत हलविले

गंगाखेड येथे भरधाव वेगातील कारने ऑटोला समोरासमोर धडक दिल्याने ऑटोतील पाच जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार (दि. २२ मे) रोजी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास पालम रस्त्यावर घडली.

May 23, 2026