महिला आत्महत्या प्रकरण

दोन चिमुकल्यांसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या! 

Female Suicide Case: लातूर जिल्ह्यात, कौटुंबिक कलहामुळे एका 25 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावात शोककळा पसरली.

दोन चिमुकल्यांसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या! 

Female Suicide Case

औसा तालुक्यातील खरोसा येथील घटना

लातूर (Female Suicide Case) : कौटुंबिक कलहातून वैतागलेल्या 25 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास औसा तालुक्यातील खरोसा येथे ही घटना घडली. कौटुंबिक वादातून होत असलेल्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या दोन निष्पाप चिमुकल्यांना सोबत घेत थेट मृत्यूला कवटाळल्याची थरारक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.

निकिता अमरदीप भूरे (वय 25) या महिलेने आपल्या शिवानी (वय 5) आणि शिवांश (वय 3) या दोन लहान मुलांसह गावाजवळील विहिरीत रविवारी मध्यरात्रीनंतर उडी घेत आत्महत्या केली. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर या (Female Suicide Case) घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून गाव शोकसागरात बुडाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादाच्या जाळ्यात अडकलेल्या निकिताने टोकाचा निर्णय घेतला, आणि दोन निरागस जीवही या दुर्दैवी घटनेत ओढले गेले. घराच्या शेजारील विहिरीत हा प्रकार घडल्याने नातेवाईक आणि शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मनोज भरत भूरे यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे. मृतदेहांचे लामजना येथे शवविच्छेदन करून मृतदेह  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे खरोसा परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी केलास स्थळ पंचनामा...

या (Female Suicide Case) घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्पॉट पंचनामा केला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने विहिरीतून तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पुढील तपासासाठी मृतदेहांना लांबजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे आई व दोन लहान चिमुकल्यांचे पोस्टमार्टम करण्यात आले. पोस्टमार्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. सध्या किल्लारी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अंत्यविधीनंतर नातेवाईकांकडून अधिकृत तक्रारीबाबत कळवू असे सांगितले.
-डॉ. विशाल शहाणे, पोलीस अधिकारी, किल्लारी

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी

Hingoli Suicide-affected farmer: दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून इसापूर-रमणा येथील शेतकरी विठ्ठल फकीरा वाढवे यांनी चार दिवसांपूर्वी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

Oct 06, 2026
 सोनं-चांदीच्या दरातील घसरण थांबली; २४ कॅरेट सोनं १,४९,१८० रुपये, चांदी २३५ रुपये प्रति ग्रॅम

सोनं-चांदीच्या दरातील घसरण थांबली; २४ कॅरेट सोनं १,४९,१८० रुपये, चांदी २३५ रुपये प्रति ग्रॅम

सोनं-चांदीच्या दरातील घसरणीला आज ब्रेक लागला आहे. १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्यासह चांदीचे आजचे दर जाणून घ्या.

Oct 05, 2026
नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Parda Farmer suicide: तालुक्यातील पारडा  येथील ५० वर्षीय अल्पभुधारक शेतकर्‍यावर  बँकेचे कर्ज व कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे  त्याने  चिंतेत राहून विषारी औषध पिऊन  आत्महत्या केल्याची घटना

Oct 04, 2026
नोएडाच्या सुपरनोव्हा सोसायटीत धक्कादायक घटना; ४३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

नोएडाच्या सुपरनोव्हा सोसायटीत धक्कादायक घटना; ४३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

नोएडाच्या सेक्टर-९४ येथील सुपरनोव्हा सोसायटीत गुरुग्रामच्या संभव जैन या तरुणाने ४३व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांचा तपास सुरू आहे.

Oct 03, 2026