जुगार छापा

जुगारावर पोलिसांचा छापा; ६ जुगारी पळाले, एकाला अटक

Kalamanuri Gambling Raid: कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे पोलिसांनी जुगारावर छापा मारला, एकाला अटक केली तर सहा जण पसार झाले. घटनेवरून आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल.

जुगारावर पोलिसांचा छापा;  ६ जुगारी पळाले, एकाला अटक

Kalamanuri Gambling Raid

कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील घटना

हिंगोली (Kalamanuri Gambling Raid) : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील नवीन प्लॉटींगमध्ये सुरु  असलेल्या  जुगारावर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये ६ जुगारी पळाले तर पोलिसांनी  एकाला  जागेवरच ताब्यात घेतले.

शेवाळा येथे नवीन प्लॉटींगच्या जागेत जुगार अड्यावर पोलीस  निरीक्षक  विष्णुकांत गुठ्ठे ,पोलीस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर,शेख अनसार, शिवाजी पवार, अरविंद जाधव, विजयकुमार जाधव पोलीस पथकाने छापा मारून दोन मोटार सायकलसह १लाख ३१ हजार ६३० मुद्देमाल जप्त केला. (Kalamanuri Gambling Raid) घटना स्थळावरून एकास ताब्यात घेतले तर सहा जण पसार झाले. याबाबत पोलीस कर्मचारी शेख अनसार फिर्यादीवरून प्रेम ईश्वरदास नरवाडे,दिपक इंगोले,सचिन नरवाडे, रतन नरवाडे व इतर ३ अनोळखी विरुद्ध  आखाडा  बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. यात एकास अटक करून समजपत्र देऊन सोडण्यात आले तर सहाजण पसार झाले आहे. पुढील तपास जोगदंड करत आहेत.

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026