अपघातात युवक ठार

जवळा बाजारमध्ये मोटरसायकल अपघातात युवक ठार

Youth Accidental Death: जवळा बाजारमध्ये शनिवारी रात्री दोन मोटरसायकलच्या धडकेत एक युवक जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आणि दुसऱ्या मोटरसायकल स्वाराचा शोध सुरू आहे.

जवळा बाजारमध्ये मोटरसायकल अपघातात युवक ठार

Youth Accidental Death

जवळा बाजार (Youth Accidental Death) : येथे शनिवारी रात्री 11 च्या सुमारास वीज उपकेंद्रासमोर दोन मोटरसायकलच्या झालेल्या धडकेत एक युवक जागीच ठार झाला तर दुसरा  मोटरसायकलस्वार अपघातानंतर पसार झाला आहे.

ही घटना घडल्यानंतर मयत युवक शेख हुसेन शेख गफार वय 19 वर्ष राहणार जवळा बाजार हा अपघातानंतर मृत होऊन वीज उपकेंद्रासमोरील रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात पडलेला आढळला. सकाळी सहा वाजता फिरायला जाणाऱ्या काही जणांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार इमरान सिद्दीकी व अंबादास बेले यांनी (Youth Accidental Death) घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शेख हुसेन शेख गफार याची एम एच 38 एस 95 34 व दुसरी मोटर सायकल एमएच ३८ एई 14 99 ही शाईन कंपनीची मोटरसायकल ताब्यात घेतली.

मयत युवकाचे शव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शव  विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटने प्रकरणी पोलीस दुसऱ्या मोटरसायकल स्वाराचा शोध घेत आहेत.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026