Family Death

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; आर्थिक अडचणीतून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय

पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; आर्थिक अडचणीतून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय

मोरवाडीतील करिष्मा ग्लोरी सोसायटीतील घटना; सुसाईड नोट सापडली, संत तुकाराम नगर पोलिसांकडून तपास सुरू

पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरातील करिष्मा ग्लोरी सोसायटीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेत विनोद पिल्ले (वय ५०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी सिरजा पिल्ले (वय ४५) आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले (वय १९) या दोघींना गंभीर अवस्थेत वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच दोघींचाही मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट आणि रासायनिक द्रव्याचा डबा आढळून आला आहे. पत्रात आर्थिक अडचणींमुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद करण्यात आले असून, "या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये," असे विनोद पिल्ले यांनी लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विनोद पिल्ले यांनी आयआयएम अहमदाबाद येथून संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले होते. ते आपल्या कुटुंबासह मोरवाडीतील करिष्मा ग्लोरी सोसायटीत राहत होते. त्यांची पत्नी सिरजा पिल्ले या एका नामांकित शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. त्या कामावर न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, १ जून रोजी विनोद पिल्ले यांनी ऑनलाइन एक रासायनिक द्रव्य मागवले होते. त्यानंतर ते कोळशावर जाळून त्याचा धूर घरात पसरवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, या संदर्भातील सर्व बाबींची पडताळणी केली जात आहे.

तपासादरम्यान पिल्ले कुटुंबावर मोठे आर्थिक कर्ज असल्याची माहितीही समोर आली आहे. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी तीन वर्षांपूर्वी नेहरूनगर येथील स्वतःचे घर विकले होते. त्यानंतर हे कुटुंब मोरवाडी येथे भाड्याच्या घरात राहत होते.

या संपूर्ण प्रकरणाचा संत तुकाराम नगर पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मृत्यूमागील नेमके कारण आणि इतर कोणतीही शक्यता आहे का, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

संबंधित सामग्री

कुटुंबीयांना न सांगता लंडनहून भारतात परतलेल्या तरुणीचा मृतदेह पुण्यामध्ये आढळला

कुटुंबीयांना न सांगता लंडनहून भारतात परतलेल्या तरुणीचा मृतदेह पुण्यामध्ये आढळला

लंडनमध्ये असल्याचा कुटुंबीयांचा समज; फूड डिलिव्हरी व्यवहारांमुळे भारतातील लोकेशन समोर आले. पुण्यातील फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह आढळला.

Oct 31, 2026
राज्यात 13,928 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 295 कुटुंबे अद्याप शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत!

राज्यात 13,928 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 295 कुटुंबे अद्याप शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत!

Maharashtra Farmer Suicides: महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव, कर्जाचा वाढता बोजा आणि अनिश्चित नैसर्गिक परिस्थिती

Oct 28, 2026
अमरावतीत पोलीस कर्मचारी अमर तायडे यांची आत्महत्या; घटनास्थळी सुसाईड नोट आढळल्याची माहिती

अमरावतीत पोलीस कर्मचारी अमर तायडे यांची आत्महत्या; घटनास्थळी सुसाईड नोट आढळल्याची माहिती

अमरावतीत पोलीस कर्मचारी अमर तायडे यांचा मृत्यू. घटनास्थळी सुसाईड नोट आढळल्याची माहिती; मृत्यूमागील कारणांचा पोलीस तपास सुरू.

Oct 21, 2026
अमरावतीत शासकीय कंत्राटदाराची आत्महत्या; अडीच कोटींची बिले थकीत असल्याची माहिती, सुसाईड नोटमधून आर्थिक संकटाचे संकेत

अमरावतीत शासकीय कंत्राटदाराची आत्महत्या; अडीच कोटींची बिले थकीत असल्याची माहिती, सुसाईड नोटमधून आर्थिक संकटाचे संकेत

अमरावतीतील कंत्राटदार सुनील वागद्रे यांच्या आत्महत्येनंतर अडीच कोटींच्या थकीत बिलांचा मुद्दा चर्चेत. कंत्राटदार संघटनेचा शासनावर आरोप.

Oct 09, 2026
SpiceJet आर्थिक संकटात; केंद्र सरकारकडून ऑपरेशन्स आणि आर्थिक स्थितीचा आढावा

SpiceJet आर्थिक संकटात; केंद्र सरकारकडून ऑपरेशन्स आणि आर्थिक स्थितीचा आढावा

SpiceJetच्या आर्थिक आणि ऑपरेशनल स्थितीवर DGCAची नजर असून, प्रवासी सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी केंद्राकडून देखरेख केली जात आहे.

Sep 23, 2026